Crime News : इन्स्टाग्रामवर (Instagram) लाइक्स (Likes) आणि कमेंटसाठी (Comments) चॅलेंज स्विकारणं दोन मुलांच्या जीवावर बेतलं. धक्कादायक म्हणजे हे चॅलेंज एका मुलीने आणि तिच्या लहान भावाने दिलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. तसंच हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुहेरी हत्याकांडाचं (Double Murder) हे प्रकरण दिल्लीतल्या (Delhi) भलस्वा डेरी परिसरीतल मुकुंदपूर इथं घडलंय. विजयादशमीच्या कार्यक्रमावरुन परतणाऱ्या साहील आणि त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला करण्यात आला. 


काय आहे प्रकरण?
आरोपी मुलगी आणि साहिल यांच्यात इंस्टाग्रामवर फॉलोअर्स (Instagram Followers) वाढवण्यावरुन आणि पोस्टवरच्या कमेंटवरुन वाद सुरु होता. यातूनच मुलीने साहिलला आपल्या एरियात येऊन दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. साहिलने हे चॅलेंज स्विकरालं. साहिल आपला मित्र निखिलसह त्या मुलीला भेटायला तिच्या एरियात पोहोचल. साहिल येणार असल्याचा अंदाज आल्याने आधीपासूनच तिथे त्या मुलीचा लहान भाऊ आणि त्या मुलीला फॉलो करणारे हत्यारं घेऊन तयार होते. साहिल आणि निखिल त्या एरियात पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर हत्यारांनी हल्ला केला.


या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले. काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता हत्यारं घेतलेल्या मुलांनी त्यांनाही धमकावलं. हल्ला केल्यानंतर आरोपी मुलं हत्यारं नाचवत तिथून फरार झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिासंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरु केली. यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं. तर जखमी साहिल आणि निखिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपाचाराआधीच साहिलचा मृत्यू झाला होता, तर उपचारादरम्यान निखिलचाही मृत्यू झाला. 


तरुण मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृत मुलांच्या कुटुंबियांनी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी मृत साहिलच्या आजीने दिली आहे. ज्या मुलीने साहिल आणि निखिलला त्यांच्या एरियात येण्याचं चॅलेंज दिलं होतं, त्या मुलीने याआधीही अनेक मुलांना धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे. 


पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून दोघांना ताब्यात घेतलं आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. परिसरात लावणअयात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.