१८ ते ४५ वयोगटालाही मिळणार कोरोना लस? या राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव
देशभरात कोविड योद्धे, सहव्याधी असणारे ४५ वर्षांवरील रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र आता १८ वर्षांवरील लोकांनाही लस (Corona vaccine) द्यायला सुरूवात करण्याबाबत मागणी होऊ लागली आहे.
मुंबई : देशभरात कोविड योद्धे, सहव्याधी असणारे ४५ वर्षांवरील रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र आता १८ वर्षांवरील लोकांनाही लस (Corona vaccine) द्यायला सुरूवात करण्याबाबत मागणी होऊ लागली आहे.
यादरम्यान १८ ते ४५ वर्षाच्या वयोगटालाही कोरोना लस (Corona vaccination) देण्याबाबत उत्तर प्रदेश सरकारचा (UP Government) विचार आहे. तसा प्रस्तावही त्यांनी केंद्र सरकारला (Central Government) पाठवला आहे.
प्रस्तावात नेमकं काय म्हटलं आहे?
१८ ते ४५ वयोगटातील सामान्यांनाही कोरोना लस देण्याबाबत परवानगी मिळावी. खासकरून या वयोगटात ज्यांना मधुमेह (diabetes) उच्च रक्तदाब (high blood pressure) सारखया समस्या आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात यावं. याशिवाय रोगप्रतिकारशक्तीशी निगडीत कुठला आजार असेल, त्यांचाही समावेश करण्यात यावा असं प्रस्तावात म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत ६ लाख ५ हजार ९१५ कोरोनाच्या एकूण केसेस आहेत. तर ८ हजार ७५१ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३४ लाख लोकांना कोरोना लस देऊन झाली आहे.
कोरोना लसीकरण युवकांनाही देण्यात यावं, अशी मागणी होतेय. देश अनलॉक झाल्याने मोठ्या स्तरावर युवा वर्ग किंवा १८ ते ४५ वयोगटातील वर्ग कामानिमित्त घराबाहेर पडतो. त्यामुळे त्यांनाही कोरोना लस देण्यात यावी, असा विचार काहींनी मांडला आहे.