Crime News : हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिलेला कारने 50 मीटर घसटत नेलं, यात त्या महिलेचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मृत महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध (Accused) गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ही ज्यूस विक्री करायची, तिचा दोष इतकाच होता की तिने गुंडांना हफ्ता देण्यास नकार दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधली (Kanpur) ही भीषण घटना आहे. कानपूरच्या नजीराबाद परिसरात राहाणारी जयमंती देवी ही महिला मरियमपूर रुग्णालयाजवळ ज्यूस विक्रीचा व्यवसाय करायची. तिच्या गाडीपासून जवळच मनोज नावाचा एक तरुण फळ विक्री करायचा. मनोज हा गुंड प्रवृत्तीचा होता, रुग्णालयाबाहेर व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून तो हप्ता गोळा करायचा. 


दर आठवड्याला तो जयमंतीकडे हफ्त्याची मागणी करायचा, पण जयमंती त्याला हफ्ता देण्यास नकार द्यायची. 8 मेच्या रात्री जयमंती आपलं दुकान बंद करुन घराकडे निघाली. त्याचवेळी मनोजने सफेद रंगाच्या एका कारमधून आपल्या काही साथीदारांसह तिचा पाठलाग केला. संधी पाहताच त्याने जयमंती मागून कारने जोरदार धडक दिली. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने कारने जयमंतीला 50 मीटरपर्यंत घसटत नेलं. आसपासच्या लोकांनी हे दुश्य पाहाताच आरडाओरडा सुरु केला. काही लोकांनी कारच्या समोर आडवं येत कार थांबवली आणि कारमध्ये फसलेल्या जयमंतीला बाहेर काढलं. तोपर्यंत मनोज कारसहित घटनास्थळावरुन फरार झाला. 


दुर्घटनेत जयमंती गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आपलं. पण उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरु केला. त्याठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात मनोजने हत्या करण्याच्या उद्देशानेच जयमंतीला कारने धडक दिल्याचं स्पष्ट दिसत झालं. आधी आरोपी मनोजने कारने तिचा पाठलाग केला, त्यानंतर त्याने जयमंतीला धडक दिली, धडकेत जयमंती कारमध्ये फसली, त्याच परिस्थितीत मनोजने तिला फरफटत नेलं. यात जयमंती जबर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.


याप्रकरणी जयमंतीच्या मुलाने तक्रार दिल्यानंतर नजीराबाद पोलीस ठाण्यात एफआआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली असून अधिक तपास सुरु आहे.