मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राद्यांमधील निवडणूक निकालांचे पडसाद आशियाई शेअर बाजारावर पाहायला मिळत य़आहेत. निकालांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजाराच चांगलीच उसळी आल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यामुळं मुंबई शेअर बाजारात सेंसेक्सनं 1552 अंकांची तेजी घेतली. (Election results)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

56200 च्या उसळीनं सेंसेक्सनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. तर, निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी पाहायला मिळाली. ज्यामुळं निफ्टीची सुरुवात 16757 वर सुरु झाला. 



पाच राज्यांमधील निवडणूक निकालांच्या दर्तीवर मतमोजणीला सुरुवात झालेली असतानाच भाजपच्या कलानं निकाल दिसू लागले आणि याचा फायदा शेअर बाजारात गुंतवणूकदारांना होत असल्याचं दिसून आलं.


शेअर बाजारात सध्या बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, रिअल इस्टेट, वीज अशा क्षेत्रातील शेअर तगडी कमाई करताना दिसत आहेत. स्मॉल आणि मिड कॅप शेअरमध्येची चांगली खरेदी दिसून येत आहे. 


सेंसेक्सचे सर्व30 स्टॉक सध्या हिरव्या निशाणावर ट्रेड करत आहेत. तर, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 46 शेअर्स हिरव्या निशाण्यावर ट्रेड करत आहेत. तर, 4 शेअर लाल निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. 


आशियाई बाजारांमध्ये असणाऱ्या या तेजीचा फायदा भारतीय बाजारांत स्पष्टपणे पाहायला मिळतआहे. तैवानचा शेअर बाजार 2.53 टक्क्यांनी. स्ट्रेट टाईम्स 1.75 टक्के, कोस्पी 2.10 टक्के, हँगसेंग 1.69 टक्के जेतीनं ट्रेड करत आहेत.