IAS Success story : जनतेच्या अधिकारी म्हणून ओळख, रोज जाणून घेतात 200 ते 300 लोकांच्या समस्या
IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वच आएएस अधिकारी बनू शकत नाहीत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते शक्य होतं. ज्याला कोणताही शॉर्टकट नाही.
मुंबई : लोकांसाठी काम करण्याची आणि लोकांची सेवा करण्याची इच्छा अनेकांमध्ये असते. पण ते करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागलं. IAS अधिकारी स्मिता सभरवाल यांच्याबाबत ती गोष्ट बोलली जाते. UPSC परीक्षेत यश मिळवणं कठीण असतं पण अशक्य नाही. अशी अनेक उदाहरणं या देशात पाहायला मिळतात. (Success Story of IAS)
एक महिला म्हणून सार्वजनिक क्षेत्रात वावरत असताना अनेक अडचणी येतात. पण यावर मात करुन जो पुढे जातो. तो यशस्वी होतो. हीच गोष्ट आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल यांनी दाखवून दिली. 2000 साली UPSC मध्ये सर्वात कमी वयात यश मिळवतं त्यांनी इतिहास रचला. मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती मिळालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.
मुळच्या दार्जिलिंगच्या असणाऱ्या स्मिता सभरवाल यांनी 19 जून 1977 में मध्ये आयपीएस अधिकारी डॉक्टर अकुन सभरवाल यांच्यासोबत विवाह केला. त्यांना 2 मुलं आहेत.
कॉमर्समधून ग्रॅज्य़ुएट असलेल्या स्मिता यांनी फक्त वयाच्या 23 व्या वर्षी IAS परीक्षेत यश मिळवलं. ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्या चौथ्या आल्या. स्मिता सभरवाल यांची नियुक्ती आधी चित्तूर जिल्ह्यात सब-कलेक्टर म्हणून झाली. नंतर आंध्र प्रदेशमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर त्या 2011 मध्ये करीमनगर जिल्ह्याच्या डीएम झाल्या.
त्यांनी हेल्थ केयर सेक्टरमध्ये 'अम्माललाना' प्रोजेक्टची सुरुवात केली. या प्रोजेक्टला यश मिळाल्यानंतर त्यांना प्राइम मिनिस्टर एक्सीलेंस अवार्डने सन्मानित करण्यात आलं.
स्मिता सबरवाल या जनतेच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. दिवसभर 6 तास अभ्यास करुन मन शांत ठेवण्यासाठी त्या रोज 1 तास मैदानी खेळ खेळायच्या.