गरोदर पत्नीच्या मृतदेहाची राख उचलातच बसला धक्का, सापडली अशी वस्तू... पतीचा पोलिसांना फोन
Shocking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला.
Schoking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार (Funeral) केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख (Ash) घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला. मेरठमधली ही घटना आहे. डिलेव्हरी दरम्यान गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नियतीचा खेळ मानून कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
काय आहे नेमकी घटना?
मेरठमधल्या हस्तीनापूर भागातील राठोरा खुर्द गावातील ही घटना आहे. इथे राहाणाऱ्या संदीप या तरुणाची पत्नी नवनीत कौर गरोदर होती. नव्या पाहुणा येणार असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. नवनीतला प्रसुतीकळा सुरु झाल्याने तीला मेरठमधल्या मवाना इथल्या केजेके रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण सर्जरीदरम्यान नवनीतचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्राव झाल्याने नवनीतचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरने तिचा पती आणि कुटुंबियांना सांगितलं. नवनीतच्या मृत्यूने संदीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
संदीपने मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
नवनीतच्या मृत्यूने संदीप पार खचला. जड अंतकरणाने त्याने नवनीतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. अस्थी विसर्जनासाठी संदीप दुसऱ्या दिवशी मृतदेहाची राख आणण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचला. राख गोळा करत असताना राखेतून त्याला एक अशी वस्तू सापडली जी पाहून त्याला धक्का बसला. राखेत त्याला चक्क सर्जिकल ब्लेड सापडला. रुग्णालयात ऑपरेशनसाठी सर्जिकल ब्लेडचा वापर केला जातो. पत्नी नवनीतच्या शस्त्रक्रियेदरम्यान सर्जिकल ब्लेड तिच्या पोटातच राहिला, ज्यामुळे नवनीतचा मृत्यू झाल्याचा आरोप संदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल
मृतदेहाच्या राखेत सर्जिकल ब्लेड सापडल्याने संदीपने रुग्णालय आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री कार्यालयातही याबाबत तक्रार दाखल केली आहे. मेरठच्या मुख्य अधिकाऱ्यांनी घटना समोर आल्यानंतर रुग्णालयचं लायसन्स रद्द करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. नवनीतच्या मृत्यूला डॉक्टरचा बेजबाबदारपणाचा कारणीभूत असल्याचं संदीप आणि त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.