नवी दिल्ली : दोन वेगवेगळ्या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. या दोन्ही घटनांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मिळून 15 जणांनी जीव गमावला आहे. उत्तराखंड इथल्या नैनीताल जिल्ह्यात एक मोठी मुसळधार पावसात एक दुर्घटना घडली. तर दुसरीकडे तमिळनाडूमध्ये देखील भीषण अपघात झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमिळनाडू इथे भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बस आणि लॉरीची जोरदार धडक झाली, त्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 


ढेला नदीमध्ये आर्टिगा गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरून वाहात होते. त्यामुळे पाणी रस्ते आणि पुलावर आलं. यावेळी पाण्याचा प्रवाह एवढा होता की गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पाण्यासोबत गेली. 


या गाडीमधून 10 लोक प्रवास करत होते. त्यापैकी एकाला रेस्क्यू करण्यात यश आलं. मात्र 10 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हे लोक ढेलाहून रामनगरकडे जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.