निनाद झारे, मुंबई : तुम्ही जर घर किंवा गाडी घेण्याच्या विचारात असाल तर निर्णय लवकर घ्या, कारण येत्या दोन महिन्यात किंवा त्याच्याही आधी रिझर्व्ह बँक व्याजाचे दर वाढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


गवर्नर शक्तिकांत दास यांचे संकेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्याजदरात वाढ होण्यामागे वाढती महागाई हे प्रमुख कारण आहे. गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी 'सध्याचे लवचीक पतधोरण आणि पर्यायाने घसरलेले व्याजदर असं ग्राहक धार्जिणी अवस्था फार काळ टिकाणार नाही' असं म्हटलं. त्यातच काल अमेरिकेतील महागाईच्या दराचे आकडे जाहीर झाले आहेत. तिथे महागाई 40 वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहचली आहे. याचं प्रमुख कारण अमेरिकेतील इंधनाचे वाढते दर हे आहे. 


जगभरात महागाई दरात वाढ


अमेरिकेप्रमाणे भारतातही सध्या महागाईचा दर सात टक्क्यांच्यावर वर आहे. त्यात अन्नधान्य आणि भाजीपालाच्याचे चढेच आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यानुसार अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर येत्या काही दिवसात पुरवठा सुरुळीत झाल्यावर खाली येतील.


परंतू इंधनाच्या दरांच्याबाबतीत तसं काहीच भाकित वर्तवता येत नाही. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरु झाल्यापासून कच्च्या तेलाचे दर 100 ड़ॉलरच्या वरच आहे. त्या शिवाय देशांतर्गत इंधनदरही वाढलेलेच आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत झाला तरी कच्च्या तेलाचे दर कमी झाले नाही. तर महागाई नियंत्रणात येणं कठीण होऊन बसणार आहे.


या परिस्थितीत गव्हर्नर दास आणि त्याच्यासोबत पतधोरण समितीकडे व्याजदर वाढीशिवाय पर्याय उरणार नाही. सध्या बहुतांश बँकांचे गृहकर्जाचे दर द.सा.द.शे साडे सहा ते सात टक्क्यांच्या आसपास आहेत. 


रिझर्व्ह बँकेनं पुढील पतधोरणात म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात रेपो दरात वाढ केल्यास बँकाही त्यांचे व्याजदर वाढवणार हे निश्चित मानायला हरकत नाही.