गलवानमध्ये शहीद जवानांना अभिनेता विक्की कौशलने केला सलाम
विक्की कौशलच्या ट्विटवर युजर्सकडून सर्जिकल स्ट्राईकचे कमेंट
मुंबई : एलएसीवर चिनी सैन्याबरोबर झालेल्या हिंसक झडपमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत चीनचे 43 सैनिकांचा ही मृत्यू झाला आहे. चीनने मात्र याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. भारतीय सैन्याच्या या मोठ्या नुकसानीवर अभिनेता विक्की कौशलने ट्विटरवर आपले मत लिहिले आहे.
विक्की कौशल याने ट्विट केले की, "गलवान खोऱ्यात शूरपणे लढलेल्या आणि आपल्या राष्ट्राच्या गौरवासाठी स्वत: शहीद झालेल्या आमच्या वीरांना मी सलाम करतो. त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून सांत्वन करतो. जय हिंद." विक्कीच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी गलवानच्या संघर्षाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
विकी कौशलच्या या ट्विट नंतर युजर्स कमेंटमध्ये उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटामधील फोटो, क्लिप आणि संवाद कमेंट बॉक्समध्ये शेअर करत आहेत. बर्याच लोकांना या घटनेनंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण आहे. जेव्हा भारताने आपल्या वीरांचा बदला घेतला होता. लोकं आता या घटनेचा उरी सारखी घटना म्हणून पाहत आहेत.
उरी आणि पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर हल्ला करणारा शत्रू पाकिस्तान हा चीनचाच मित्र आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर भाषेत उत्तर दिले होते. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 भारतीय जवान शहीद झाले. उरी येथील भारतीय सैन्याच्या मुख्यालयात पहाटे साडेपाच वाजता दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी 3 मिनिटांत 17 हॅन्ड ग्रेनेड फेकले होते.