नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये १२ मेला निवडणुका होणार आहेत. सर्व राजकिय पक्ष याच्या तयारीला लागले आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सभा आणि रोड शो करत आहेत. असाच एक रोड शो टुमकुरमध्ये होता. खुल्या गाडीवर राहुल गांधी उभे होते.गाडी रस्त्याने चालली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुने गर्दी होती. अचानक गर्दीतून एक माळ आली. खूप अंतरावर एक कार्यकर्ता होता. पण त्याने फेकलेली माळ हवेतून आली आणि राहुल यांच्या गळ्यात पडली. माळ फेकणाऱ्या माणसाच्या मागे कोणीतरी उभं होत, जो मोबाईलमध्ये राहुल यांचा व्हिडिओ कैद करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या मोबाईलमध्ये हा प्रसंग कैद झाला. हा व्हिडिओ खूप शेअर झाला. कॉंग्रेस नेता रक्षित शिवारामने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर राहुल यांना इजा पोहोचली असती 



माळ फेकली म्हणून या घटनेला गांभिर्याने घेतलं गेल नसेल पण याऐवजी काही दुसरी वस्तू असती तर राहुल यांना इजा पोहोचली असती. निवडणुक प्रचारात नेत्यांसोबत काय काय होत याला इतिहास साक्षीदार आहे. राजीव गांधी यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेतून देशाला सावरायला बराच वेळ गेला. त्यामुळे राहुल यांच्या सुरक्षारक्षकांचीही जबाबदारी तेवढीच वाढली आहे.