`ये मोहब्बत भी क्या चीज है...` उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने लिहिली शायरी, मोठ्या अक्षरात लिहिलं I LOVE MY POOJA
Answer Sheet Viral: परीक्षेत विद्यार्थ्याने उत्तराऐवजी पूजासाठी लिहीली शायरी, सोशल मीडियावर उत्तर पत्रिका होतेय व्हायरल
Student Note In Answer Sheet: शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी अनेक विद्यार्थी (Student) रात्रंदिवस अभ्यास करतात. पण असे काही नग असतात जे पूर्ण वर्ष मजा-मस्ती करतात आणि परीक्षेत उत्तरांऐवजी वाटेल ते लिहितात. उत्तरपत्रिकेत असं काही लिहितात की ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतं. सध्या सोशल मीडियावर अशीच एक उत्तर पत्रिका व्हायरल होत आहे. प्रश्नाचं उत्तर आठवत नसल्याने पठ्ठ्याने थेट शायरीच लिहिली, इतकंच नाही तर मोठमोठ्या अक्षरात त्याने I LOVE MY POOJA असंही लिहिलं.
उत्तरपत्रिकेत लिहिली शायरी
उत्तर प्रदेशाच इंटरमिडिएट परीक्षेतला हा प्रकार आहे. या विद्यार्थ्याने रसायनशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत (Answer Sheet) उत्तराऐवजी शायरी लिहिली आहे. 'ये मोहब्बत भी क्या चीज है, न जीने देती है न मरने देती है. ये दुआ करो वो न मिले तो मैं मर ही जाऊं.' अशी शायरी त्याने लिहिलीय. त्यानतंर ठळक आणि मोठ्या अक्षरात त्याने I LOVE MY POOJA असंही लिहिलं. यानंतर त्याने शिक्षकांची माफी मागणारं वाक्य लिहिलंय. या प्रेमप्रकरणामुळे अभ्यास होऊ शकला नाही, शालेय जीवनात खूप अभ्यास केला, सर हे लिहिण्यासाठी मला माफ करा, असंही त्याने शेवटी लिहिलंय.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी जेव्हा ही उत्तरपत्रिका पाहिली, तेव्हा त्यांनी त्यावर लाल रंगाच्या पेनाने रेघोटे मारले. त्यानंतर त्याचा फोटो काढला. आता ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अजून एका उत्तरपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात एका विद्यार्थ्याने चांगले गुण मिळावेत यासाठी चक्क 100 रुपयांच्या तीन नोटा उत्तरपत्रिकेसोबत जोडल्या आहेत.
उत्तरपत्रिकेसोबत जोडल्या शंभरच्या नोटा
एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांसाठी शंभर रुपयांच्या तीन नोटा उत्तरपत्रिकेसोबत जोडल्या. परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी त्याने शिक्षकांनाच लाच देण्याचा प्रयत्न केलाय. वर्षभर अभ्यास न केल्यान परीक्षेत पास होणार नाही याचा विश्वास त्या विद्यार्थ्याला आहे. त्यामुळे निदान पैसे देऊन पास करावं अशी विनंती त्याने शिक्षकांकडे केली आहे.