Viral Video Japanese Woman: होळीच्या निमित्तानं आपण आपल्या मित्र- मैत्रीणींसोबत आनंदानं आणि जल्लोषानं होळी साजरी करतो. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आपण शेअर करत आपण कशा प्रकारे होळी साजरी केली हे दाखवतो. बऱ्याचवेळा होळीच्या निमित्तानं महिलांसोबत काही विचित्र प्रकारही होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ज्या प्रकारे एका तरुणीला होळीच्या दिवशी चुकीची वागणूक दिली आहे, त्यावरून हा वाद पेटला आहे. (Viral Video) 
 
सध्या ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही मुलं होळीच्या दिवशी रंग लावण्याच्या बहाण्याने मुलीसोबत गैरवर्तवणूक करत आहेत. या व्हिडीओतील मुलगी ही होळी निमित्तानं भारतात आलेली विदेशी प्रवासी आहे. त्या मुलांनी मुलीच्या भोवती गर्दी केली. कोणी तिला रंग लावत आहे, तर कोणी तिच्यावर अंड फोडलं आहे. तर कोणी तिच्यावर स्प्रेनं रंग लावत आहे. इतकं सगळं होत असताना कोणी तरी त्या मुलीचा जवळून व्हिडीओ काढताना दिसत आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये त्या मुलीचा चेहरा दाखवण्यात येतो आणि त्यावेळी देखील एक मुलगा तिला रंग लावण्याच्या बहाण्यानं गैरवर्तवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहता ती मुलगी त्याला मारत लांब करण्याचा प्रयत्न करते आणि तिथून निघून जाते. (Trending Video)




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ शेअर करत एका नेटकऱ्यांनं कमेंट केली की जे लोक #BHARATMATRIMONY या होळीच्या कॅम्पेनच्या विरोधात होते हे त्यांच्यासाठी आहे. एका विदेशी प्रवासीला भारतात देण्यात आलेली वागणूक. या जागी तुमच्या बहिणीसोबत, आई किंवा मग पत्नीसोबत असं कोणी दुसऱ्या देशात केलं तर? तेव्हा तुम्हाला कळेल की काय वाटते. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी या सगळ्याचा विरोध केला आहे. 



हेही वाचा : एका लग्नाची गोष्ट; Mahesh Babu चा भाऊ चौथ्यांदा बोहल्यावर, ‘ती’ झाली तिसऱ्यांदा नवरी


अभिनेत्री रिचा चड्ढा संतप्त!


दरम्यान, अनेक सेलिब्रिटी देखील या गोष्टीचा विरोध करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढानं देखील या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट करत त्यांना अटक झालीच पाहिजे असे म्हटले आहे. दरम्यान, फक्त हा एकच व्हिडीओ नाही ज्यात विदेशी प्रवाशांना होळीच्या निमित्तानं अशी वागणूक देण्यात आल्याचे पाहायला मिळते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जर आपले सण पाहायला आलेल्या विदेशी प्रवाशांसोबत आपण असे गैरवर्तन केले तर आपल्या देशाची प्रतिमा कशी होणार याचा विचार कोणी करत नाही, असे देखील अनेकांचे म्हणणे आहे.