एका लग्नाची गोष्ट; Mahesh Babu चा भाऊ चौथ्यांदा बोहल्यावर, ‘ती’ झाली तिसऱ्यांदा नवरी

Mahesh Babu च्या भावानं केलं चौथ्यांदा लग्न! व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे मागितला आशीर्वाद, दरम्यान, या आधी नरेश हे त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ट्रोल झाले होते. त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगत लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. 

Updated: Mar 10, 2023, 04:04 PM IST
एका लग्नाची गोष्ट; Mahesh Babu चा भाऊ चौथ्यांदा बोहल्यावर, ‘ती’ झाली तिसऱ्यांदा नवरी title=

Mahesh Babu's Step Brother Got Married : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी महेश बाबू हा त्याचा सावत्र भाऊ नरेश विजय कृष्णामुळे (Naresh Vijay Krishna) चर्चेत आहे. नरेश हा चौथ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी नरेश बाबू मूव्हीजनं नरेश आणि त्यांची गर्लफ्रेंड पवित्रा लोकेशच्या लग्नाचा खुलासा केला होता. दरम्यान, आता त्यांनी अखेरीस सप्तपदी घेतल्या आहेत. नरेश बाबू यांचे हे चौथे लग्न आहे तर पवित्रा (Pavitra) यांचे हे तिसरे लग्न आहे. लग्नातील व्हिडीओ नरेश यांनी सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

नरेश विजय कृष्णा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांचं लग्न होतं असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आयुष्यभरासाठी आणि नव्या प्रवासासाठी तुमचा आशीर्वाद असू द्या. नरेश विजय यांचा तिसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी पवित्रा यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. नरेश यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव राम्या रघुपती असे आहे. या आधी त्यांची तीन लग्न झाली असून त्यांना तीन मुलं देखील आहे.  पवित्रा लोकेश ही कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

हेही वाचा : अरुंधतीनं या वयात लग्न करावं की नाही? Aai Kuthe Kay Karte वादावर मधुराणीची प्रतिक्रिया

दरम्यान, लग्नाआधीपासून पवित्रा आणि नरेश हे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 2021 साली त्यांनी लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोन वर्ष लिव्हइमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नरेश यांच्या चौथ्या लग्नानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

नवीन वर्षानिमित्तानं शेअर केलेल्या व्हिडीओमुळे झाले होते ट्रोल

नरेश यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते पवित्रा एकत्र दिसत होते. त्यांच्या आजूबाजुला हा संपूर्ण रोमॅंटिक सेटअप होता. त्यावेळी त्यांनी सगळ्यात आधी केक कापला आणि नंतर एकमेकांना केक भरवल्यानंतर त्यांनी किस केले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळीच त्यांनी लग्नाची घोषणा देखील केली होती. या घोषणेवरून नरेश आणि पवित्रा या दोघांनाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आज हे दोघेही लग्न बंधनात अडकले आहेत.