Cloudburst in Kullu: हिमाचल प्रदेशमध्ये असणाऱ्या कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळं एकच हाहाकार माजला आहे. या खोऱ्यात असणाऱ्या चोज गावात मोठं नुकसानही झालं आहे. सदर आपत्तीमुळे चोज गावात 3 घरं आणि 2 कॅम्पसाईट वाहून गेल्या आहेत. शिवाय प्राथमिक माहितीनुसार 4 जण बेपत्ता आहेत. (Viral video of Cloudburst in Kullu manikaran valley)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता नागरिक हिमाचल प्रदेशातीलचल असून,  सुंदर नगर, धर्मशाला, बंजार आणि राजस्थानातील पुष्कर येथील रहिवासी आहेत. 


ढगफुटीमुळे या भागात असणारं मलाना पॉवर प्रोजेक्टमधील 2 धरण क्षेत्रांमध्ये असणाऱ्या इमारतीचंही नुकसान झालं आहे. या इमारतीमधून 25 हून अधिकजणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. 


सदर आपत्तीमुळं शिमला- किन्नौर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान खात्यानं या भागामध्ये बुधवारसाठी मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. 


मंगळवारी रात्रीपासूनच शिमला परिसरासोबतच हिमाचलच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला. ज्यामुळं धर्मशाला, शिमला, बिलासपूर, कुफरी या भागांमधील जनजीवन विस्कळीत झालं. या साऱ्याचे परिणाम वीजपुरवठा, दूरध्वनी आणि दळणवळणावरही झाले. 




दरम्यान, सध्याचे महिने हिमाचल आणि नजीकच्या परिसरातील पर्यटनासाठी पूरक असणारे महिने आहेत. पण, मागील काही वर्षांमध्ये हवामानात होणारे मोठे बदल पाहता पर्यटकही इथं येण्यापूर्वी दोनदा विचार करत आहेत.