मुंबई : सोशल मीडियाच्या जगात, आपल्यासमोर कधी कोणती बातमी किंवा व्हिडीओ येईल हे काही सांगता येणार नाही. परंतु सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जेथे लोकं एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ सामायिक करत आहेत. जे पाहताना लोकांचे खूप मनोरंजन होते. त्यात असे काही व्हिडीओ असतात जे सारखे सारखे पाहिले जातात तरीही लोकांचे मन भरत नाही. विशेषत: लोकांचे जुगाड किंवा टेक्नॉलॉजीचा वेगळ्याप्रकारे वापर या संबंधित व्हिडीओ सध्या ट्रेंडमध्ये आहेत, या व्हिडीओजना लोकांकडून खूप पसंती दर्शवली जात आहे. असाच एक जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सगळ्यांना तर माहित आहे की, भारतीय हे अशा प्रकारचे जुगाड करण्यात किती पुढे असतात. भारतात जवळजवळ सगळेच स्वत:ला इंजीनिअर समजतात आणि काही ना काही वेगळा जुगाड करण्याचा प्रयत्न करत असतात.


आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकं त्यांच्या सोयीनुसार नवीन शोध करतात. हे तसे आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे, परंतु आजकाल सोशल मीडियामुळे अशा लोकांना त्यांच्यातील स्किल्स दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. ज्यामुळे लोकांचे मनोरंजन देखील होते.


व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एका व्यक्तीने आपली सायकल एका स्कूटीशी जोडली आहे आणि तो ती रस्त्यावरून चालवत जात आहे. समोरुन या गाडीला पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की, खरोखर ही एक स्कूटीच आहे, परंतु जेव्हा तुम्ही याला बाजूने पाहाल तेव्हा तुम्हाला स्कूटी कम सायकल पाहून फार हसू येईल.



लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत करत आहेत, यावर बर्‍याच लोकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ज्याने हे बनवले आहे तो किती हुशार असावा, मानले पाहिले त्याला. दुसरीकडे, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, 'हे पोलिसांना फसवण्यासाठी चे निन्जा टेकनिक आहे' तसेच इतर बर्‍याच वापरकर्त्यांनी या व्हिडीओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले आहे.