Anand Mahindra Tweet: महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. अनेक नवनवीन संकल्पना लोकांपर्यंत पोहोचाव्या, असा त्यांना मानस असतो. त्यासाठी भन्नाट आणि युनिक व्हिडिओ (Anand Mahindra Tweet Video) आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. त्यांच्या काही व्हिडिओमुळे नक्कीच काही तरुणांना प्रेरणा मिळते. अशातच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर (Anand Mahindra Tweet) एका मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणाने इन्फ्लेटेबल फुगवलेला टी-शर्ट एन्वेन्ट केलाय. त्याचा डेमो दाखवतानाचा एक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. यामध्ये एक तरुण लहान मुलाचा शर्ट घेऊन उभा असल्याचं दिसतोय. त्यावर तो आपल्या प्रयोगावर भाषण देतो. लाल आणि पांढऱ्या आडव्या रंगाचा हा टी शर्ट तो पाण्यावर तरंगतो. या खास पद्धतीने हा टी-शर्ट डिझाईन (Man invented unique inflatable t shirt) करण्यात आला आहे.


आणखी वाचा - नवीन कार घेतल्यानंतर शोरूममध्ये फॅमिलीचा हटके डान्स, आनंद महिंद्रा भारावले; पाहा Video


लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त जॅकेट पाण्यात टाकल्यावर तरंगताना दिसतंय. टी-शर्टच्या कॉलरच्या भागात अशी वस्तू बसवली आहे, जी पाण्याखाली गेल्यावर उघडतं, त्यामुळे लहान मुल पाण्यात चुकून पडलं तरी बुडणार नाही. तरूणाने एका डमी पुतळ्याच्या सहाय्याने तरुणाने प्रयोग करून दाखवला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.


पाहा Video 



मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या व्हिडिओवर आनंद महिद्रा यांनी देखील कमेंट केलीये. या शोधाला नोबेल पारितोषिक मिळू शकत नाही. मात्र, माझ्यासाठी तो कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे, असं म्हणत महिंद्रा यांनी कौतूक केलंय. दोन मुलांचा आजोबा या नात्याने त्यांची सुरक्षितता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.