मुंबई : इंटरनेटवर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे नेहमीचं आपलं मनोरंजन करतात. तसेच तुम्ही चोरीचे देखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत. जो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हा एक सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यामध्ये एक महिला अशी काय हात सफाई करते की, कोणालाही थांग पत्ता लागत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काकू ज्या पद्धतीने मोबाईल चोरते ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही काकू दुकानात तिच्या शेजारी उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून मोबाईल कसा चोरते. काकूची ही कृती पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत.


व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात खूप गर्दी आहे. सामान घेण्यासाठी लोकांची घाई सुरू होती. तेवढ्यात एक काकू तिथे येते. ही काकू तेथे गर्दीत येऊन उभी राहाते आणि दुकानदाराकडून काही वस्तू मागते. यादरम्यान ती शेजारी उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समध्ये हात घालते आणि अतिशय हुशारीने महिलेचा मोबाईल चोरतो. यानंतर, मोठ्या हुशारीने, तो फोन स्वत:च्या पर्समध्ये ठेवून, तेथून निघून जाते.


एकदा हा व्हिडीओ पाहा-


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ज्या महिलेचा मोबाईल चोरीला गेला आहे, तिच्या मनात किंचितही संशय येणार नाही की आपल्या बाजूला उभी असेलली ही महिला असं काहीतरी काम करेल. ही काकू मोबाईल चोरीटं काम इतक्या हातसफाईने करते की, त्या महिलेलाच काय तिथे उपस्थीत कोणाच्याही ते लक्षात आलं नाही.


giedde नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. ज्यावर युजर्स भरभरुन कमेंट्स करत आहेत. तसेच एकमेकांना हा व्हिडीओ शेअर करुन अशा फसव्या लोकांपासून सावध राहण्यासाठी सांगत आहेत.


तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहा आणि स्वत:ची अशी फसवणूक होऊ देऊ नका.