Weather Update : देशाच्या उत्तर भागात (North India) प्रचंड थंडी जाणवू लागली आहे. (Kashmir) काश्मीरपासून ते अगदी (Madhya Pradesh )मध्यप्रदेशपर्यंत या कडाक्याच्या थंडीचे परिणाम घसरलेल्या तापमानातून दिसत आहेत. तिथे उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) परिस्थिती जवळपास सारखीच आहेत. एकिकडे देशाच्या अती उत्तरेला असणाऱ्या राज्यांमध्ये अपेक्षित हिवाळा सुरु झालेला असतानाच दिल्लीमध्ये एकाएकी पारा खाली गेला आणि अनेकांनाच आश्चर्य वाटू लागलं. एरव्ही दिल्लीमध्ये तापमान किमान 5 अंशांपर्यंत खाली जातं, तेसुद्धा फार क्वचितच. पण, यावेळी मात्र दिल्लीचं (Delhi) तापमान 1.8 अंश सेल्सियस होतं आणि हा आकडा हिमाचलपेक्षाही कमी होता. (Weather Forecast update cold wave in delhi himachal kashmir maharashtra latest marathi news)


पाकिस्तान आणि दिल्लीच्या थंडीचं काय कनेक्शन? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (pakistan) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) येथून येणाऱ्या शीतलहरींचा थेट परिणाम दिल्लीच्या तापमानावर दिसून येत आहे. पर्वतीय भागांपेक्षाही दिल्ली एनसीआरमध्ये तापमान कमी असण्यामागे हेच कारण सांगण्यात येत आहे. डिसेंबर महिन्याच्या मघ्यापासूनच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून हे वारे दिल्लीपर्यंत येतात आणि इथं थंडी धडकते. तसंच, दिल्लीच्या आजूबाजूला काही पर्वतीय भागही असल्यामुळं तिथंसुद्धा तापमानात घट झालेली असते. परिणामी दिल्लीचं तापमान घसरतं. 


महाराष्ट्रात पुढचा आठवडा हुडहूडी 


कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाज पाहता येत्या आठवड्यामध्ये राज्यात तापमान मोठ्या फरकानं कमी होणार असून, थंडीची लाट येणार आहे. 9 आणि 10 जानेवारी या दोन दिवशी राज्यातील तापमानाच लक्षणीय घट होईल. इतकंच नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हा आठवडा थंडीचाच असेल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. (Mumbai winter news)


हेसुद्धा वाचा : Latest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट


हवामानातील बदलांचा आरोग्यावर परिणाम 


मुंबई आणि राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण, सकाळच्या वेळी जाणवणारा उकाडा आणि संध्याकाळच्या वेळी सुटणारा गार वारा हे संपूर्ण वातावरण पाहता नागरिकांच्या आरोग्यावर याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत. येत्या काळात सर्दी, खोकला, ताप अशा समस्याही नागरिकांना जाणवू शकतात. त्यामुळं आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. एकिकडे तापमानाच होणारी घट आणि दुसरीकडे मुंबईत खोकला- सर्दीची साथ पाहता या परिस्थितीमध्ये कोरोनाचं (Corona) सावटही अनेकांनाच भेडसावताना दिसत आहे. (health updates)