Weather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; `या` 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले.
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले. किंबहुना काही दिवसांपूर्वीच भारतीय हवामान विभागानं 2022 या वर्षाचा शेवट थंडीनंच होणार असल्याचा अंदाज वर्तवला. ज्यानंतर यामध्ये एक मोठी माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला पडलेली थंडी आता काही दिवसांतच नाहीशी होणार असून, काही राज्यांना हवामान खात्यानं पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसाची हजेरी असू शकते असं सांगण्यात आलं आहे.
पुढील 24 तासांमध्ये अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh), आसाम (Assam), बिहार (Bihar), झारखंड, पश्चिम बंगाल (West bengal), दक्षिणेकडील किनाऱ्यालगत असणाऱ्या आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. (Maharashtra cold wave) महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये हिवाळ्यानं चांगला जोर पकडलेल्या असताना पुन्हा अनेक ठिकाणी तापमान 15 अंशांच्या पलीकडे गेलं आहे. ढगाळ वातावरण आणि कोरडी हवा यामुळं वातावरणातील या बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणा होताना दिसत आहे.
पर्वतीय भागांमध्ये काय परिणाम?
तिथे हिमालय (Himalayan Mountain ranges) आणि लगतच्या पर्वतीय भागामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असल्यामुळं या भागामध्ये जोरदार बर्फवृष्टीचा (Snowfall) अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आणि पर्वतीय पट्ट्यामध्ये हिमवर्षाव झाल्यास त्यामुळं पुन्हा एकदा एकिकडे पाऊस तर दुसरीकडे थंडी अशी परिस्थिती उदभवू शकते.
हेसुद्धा वाचा : अमेरिकेत भयानक हिमवादळ; मायनस 57 डिग्री तापमानात जिवंत राहण्यासाठी धडपड
उत्तर प्रदेश, नागालँड, मेघालय, पूर्व आसामच्या भागामध्ये थंडी आणि तुरळक पाऊस होणार आहे. यावेळीसुद्धा हवामानाच्या परिस्थितीमुळं आयएमडीकडून नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पण, हा ऑरेंज अलर्टचा इशारा इथं पावसामुळं नसून, धुक्यामुळं देण्यात आला आहे. सदर भागातील दृश्यमानता कमी झाल्यामुळं संभाव्य धोका टाळण्यासाठी हवामान खात्यानं सतर्कतेची पावलं उचलली आहेत.
महाराष्ट्रात काय परिस्थिती ? (Maharashtra Weather Update )
राज्याच्या कोकण (Konkan) पट्ट्यावर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवत काही भागांमध्य़े पहाटेच्या वेळी ढगाळ वातावरण असेल असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान, 31 डिसेंबरपर्यंत उत्तर, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तापमान किमान 3 अंशांनी खाली उतरेल. त्यामुळं हवामानाची ही परिस्थिती पाहता तुम्ही कुठे फिरण्यासाठी जात असाल तप हिवाळा आणि पावसाळा अशा दोन्ही ऋतूंना अनुरुप तयारी करूनच जा!