Chanakya Niti : हे ४ मित्र अडचणीतही तुमची साथ सोडत नाहीत, जाणून घ्या का?
आचार्य चाणक्य म्हणतात की, एखादा माणूस एकटाच जन्म घेतो आणि तो एकटाच मरतो.
मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्तीचे त्याच्या सभोवतातील वस्तू आणि गोष्टींसोबत असलेल्या संबंधाबद्दल बर्याच गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या आनंद आणि दु:खा शिवाय त्यांनी बऱ्याच गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या आहेत. त्याच बरोबर त्यांनी आयुष्यातील समस्या सोडवण्याचा मार्ग देखील दाखवला आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात की, एखादा माणूस एकटाच जन्म घेतो आणि तो एकटाच मरतो, परंतु जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या कृत्याने चांगले आणि वाईट काम करुन त्याचे परिणाम भोगातो. आज आम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अकाही उपदेशात्मक गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. परंतु त्या आधी मनुष्या बद्दल चाणाक्य नीती काय म्हणते हे जाणून घ्या.
जगातील सर्वात सुखी व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या नीति शास्त्रानुसार, ते लोकं या जगातील सर्वात सुखी लोकं आहेत, ज्यांना आपल्या कु़टूंबीयांबद्दल उदार भावना आहे. तसेच जे अनोळखी लोकांबरोबर चांगल्या भावनेने वागतात. परिपूर्ण वर्तन करतात, विद्वानांपासून काहीही लपवू ठेवत नाहीत आणि शत्रूंसमोर धैर्य दाखवतात ते लोकं आयुष्यात नेहमीच सुखी रहातात.
ज्याने कोणतेही दान दिले नाही
आचार्य चाणक्य म्हणतात, ज्यांच्या हातांनी काही दान दिले नाही, ज्यांच्या कानांनी कोणतेही ज्ञान घेतलेले नाहीत, ज्यांच्या डोळ्यांनी परमेश्वराचा खरा भक्त पाहिला नाही, ज्यांचे पाय कधीही तिर्थक्षेत्रांवर गेले नाहीत, ज्यांनी संपत्ती मिळविली आहे. त्याने आपले पोट भरुन ठेवले आहे. परंतु दुसऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. असे लोकं कधीही सुखी राहू शकणार नाहीत.
चाणक्य नीतिच्या मते, माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरण पावतो. तो स्वत: त्याच्या कृतीच्या चांगल्या आणि वाईट परिणामांची फळे भोगतो. तो एकटाच नरकात किंवा स्वर्गात जातो.
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या जीवनात असे चार मित्र आहेत, जे कठीण परिस्थितीतही कधी साथ सोडत नाहीत
आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा विद्या हा तुमचा खरा मित्र असते. तसेच, तुमची पत्नी तुमचा खरा मित्र आहे. त्याचप्रमाणे, आजारी असताना औषध हा तुमचा खरा मित्र आहे आणि तुम्ही केलेले पुण्य तुमच्या मृत्यू नंतरचा एकमेव मित्र आहे. त्यामुळे यांना नहमी बरोबर ठेवा. यांना कधीही तुमच्यापासून लांब करु नका.
त्यामुळे आता जे कर्म कराल त्याचे चांगले वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे.