बँकेत जाऊन फक्त एक सुविधा Activate करा आणि मिळवा तिप्पट व्याज; कधी कोणी सांगितलं नाही का?
Bank Services : देशभरात अनेक खासगी बँका असून, काही सरकारी बँकासुद्धा खातेधारकांना ठेवींसह इतरही योजना देतात. या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य देण्याचा हेतू केंद्रस्थानी असतो.
Bank Services : बँकेकडून एफडी, आरडी आणि तत्सम ठेवींवर खातेधारकांना व्याज दिलं जातं. सरकारी बँकांच्या तुलनेक खासगी बँकांकडून मिळणारा व्याजाचा आकडा मोठा असतो. त्याशिवाय कोणत्याही बँकेत बँक डिपॉझिटवर फारसं व्याज दिलं जात नाही. पण, एफडी हे उत्तम व्याज मिळवण्याचं माध्यम ठरू शकतं.
बँक खातेधारकांना कैक सुविधा देतं, यापैकी काही सुविधांची खातेधारकांनाही कल्पना नसते. अशीच एक सुविधा म्हणजे, ऑटो स्वीप सर्विस (Auto Sweep Service). याविषयी अनेकांनाच माहिती नसते. ही एक अशी सुविधा आहे जी खातेधारकांना बँकेकडून तिप्पट व्याज मिळवून देऊ शकते. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी बँकेत जाऊ ती सुरू करून घेणं अपेक्षित असतं.
ऑटो स्वीप सर्विस ही एक अशी सुविधा आहे, जी ग्राहकांना सरप्लस फंडवर अधिक व्याज मिळवून देते. खातेधारकांनी ही सुविधा सुरू केल्यास तुमच्या Saving Account मधील जमा रक्कम एका मर्यादेहून अधिक असल्यास किंवा सरप्लस फंड असण्याच्या स्थितीमध्ये आपोआपच फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडीमध्ये ट्रान्सफर केली जाते. परिणामी Saving Account मध्ये मिळणाऱ्या व्याजाऐवजी बँक एफडीवर मिळणाऱ्या व्याजदाराचा फायदा खातेधारकांना मिळतो.
हेसुद्धा वाचा : आरामाचेही 7 प्रकार; कोणासाठी कोणता प्रकार गरजेचा?
उदाहरणासह समजून घ्यायचं झाल्यास, तुम्ही खात्यामध्ये 20 हजार रुपयांची मर्यादा ठेवली आहे आणि या खात्यात 60 हजार रुपये डिपॉझिट केले आहेत तर, ऑटो स्वीपअंतर्गत 20 हजार रुपयांहून अधिकची रक्कम म्हणजेच जास्तीचे 40 हजार रुपये एफडी खात्यामध्ये दिसू लागतील आणि तिथं FD चा व्याजदर लागू होईल. तर, 20 हजार रुपयांवर Saving Account चाच व्याजदर लागू असेल. म्हणजेच एखादी बँक Saving Account वर 2.5 टक्के व्याज देत असेल आणि FD वर 6.5 ते 7 टक्के व्याज देत असेल तर, वाढीव रकमेवर तिप्पट व्याजदर सहज मिळवता येतो. वरील सुविधेमुळं खातेधारकांमध्ये जास्तीत जास्त saving करण्याची सवय रुजते. शिवाय या सुविधेअंतर्गत एफडीमध्ये व्यक्तिगरित्या पैसे ट्रान्सफर कराण्याची आवश्यकता नसून ही संपूर्ण प्रक्रिया Automatic पूर्ण होते.