Leave Encashment: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देते. या सुट्ट्या न घेतल्यास कंपनी त्या बदल्यात पैसे देते. या प्रक्रियेला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) असं बोललं जातं. कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांबाबत माहिती देते. तसेच किती सुट्ट्या एनकॅश करु शकता, याबाबत सांगितलं जातं. खासगी कंपनीत वर्षाला जास्तीत जास्त 30 सुट्ट्या एनकॅश करण्याचा नियम आहे. सरकारसुद्धा वर्षाच्या 30 सुट्ट्यांच्या लीव्ह एनकॅशमेंटसाठी कर सवलत देते. पण प्रत्येक कंपनीचा याबाबतचा नियम वेगळा असतो. काही कंपन्या सुट्ट्यांचे पैसे वर्ष संपल्यावर देते. तर काही कंपन्या कंपनी सोडल्यानंतर सुट्ट्यांचे पैसे एकरकमी देते. कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त कामासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, कंपन्या लीव्ह एनकॅशमेंटची सुविधा देते. परंतु लीव्ह एनकॅशमेंटसाठी कोणताही सरकारी नियम नाही. म्हणजेच जर एखाद्या कंपनीने लीव्ह एनकॅशमेंट केली नाही, तर तुम्ही त्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकत नाही. लीव्ह एनकॅशमेंटची सुविधा द्यायची की नाही हे कंपनीवर अवलंबून असतं.


बेसिक सॅलरी आणि डीएवर आधारित पैसे मिळतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुट्ट्या एनकॅश केल्यानंतर पैसे कसे मिळतात असा प्रश्न अनेकांना पडतो. एक सुट्टी म्हणजे एक दिवसाचा पगार, असा विचार करत असाल तर ते तसं नसतं. लीव्ह एनकॅशमेंट बेसिक सॅलरी आणि डीएवर आधारीत असतं. त्या गणितानुसार पैसे दिले जातात. 


बातमी वाचा- Success Story: वडिलांनी जमीन विकून मुलांना दिले 20 हजार रुपये, आता 3000 कोटींचा उद्योग


कोणत्या सुट्टीच्या दिवशी रजा रोख रक्कम उपलब्ध आहे?


खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही सुट्ट्या दिल्या जातात. सिक लीव्ह, कॅज्युअल, अर्न्ड आणि प्रिव्हलेज लीव्ह अशा सुट्ट्या असतात. कॅलेंडर वर्षात सिक आणि कॅज्युअल लीव्ह न वापरल्यास लॅप्स होतात. मात्र अर्न्ड लीव्ह आणि प्रिवलेज लीव्ह एनकॅशमेंट करू शकता. मात्र प्रत्येक कंपनी आपल्या पद्धतीने नियम आणि अटी करू शकते.