Success Story: वडिलांनी जमीन विकून मुलांना दिले 20 हजार रुपये, आता 3000 कोटींचा उद्योग

Balaji Wafers: आजच्या यशोगाथेत आम्ही गुजरातमधील जामनगर या छोट्या गावात राहणाऱ्या तीन भावांची कहाणी सांगणार आहोत. तीन भाऊ मिळून 3 हजार कोटी रुपयांचं व्यवसायिक साम्राज्य निर्माण करतील, असे कुणालाही वाटलं नव्हतं.

Dec 08, 2022, 16:32 PM IST
1/7

balaji wafers success story

1. चंदू भाई, भिखुभाई आणि मेघजीभाई विराणी या तीन भावांचे वडील गरीब शेतकरी होते. मात्र गरिबीपुढे हार न मानता तिन्ही भावांनी शहरात जाऊन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होईल असा निर्धार होता.

2/7

balaji wafers success story

2. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. मात्र वडिलांकडे तितके पैसे नव्हते. वडिलांनी मुलांना मदत करण्यासाटी एकमात्र जमीन विकली. तिन्ही भावांना व्यवसाय करण्यासाठी 20,000 रुपये दिले.

3/7

balaji wafers success story

3. सर्वप्रथम चंदूभाई यांनी त्यांच्या दोन भावांसह शेती उपकरणांचे दुकान सुरु केले. मात्र त्यांना या व्यवसायात हवं तसं यश मिळालं नाही आणि त्याचवेळी त्यांना तोटाही सहन करावा लागला.

4/7

balaji wafers success story

4. तोटा सहन करूनही त्यांनी धीर गमावला नाही. त्यानंतर त्यांनी आपला नवीन व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांनी चित्रपटगृहांसमोर पत्नीने बनवलेले वेफर्स आणि सँडविच विकण्यास सुरुवात केली.

5/7

balaji wafers success story

5. अशी स्थिती जवळपास 15 वर्षे सुरु होती. ग्राहकांना घरी बनवलेले वेफर्स खूप आवडतात, हे त्यांनी हेरलं. अशा परिस्थितीत त्यांनी 1989 मध्ये सेमी ऑटोमॅटिक वेफर्स प्लांट उभारला.  

6/7

balaji wafers success story

6. तिन्ही भावांनी मिळून बालाजी वेफर्सच्या बॅनरखाली चांगल्या दर्जाची उत्पादने परवडणाऱ्या किमतीत विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागला होता, परंतु आजच्या तारखेला तिन्ही भावांचे मार्केटमध्ये बरेच वर्चस्व आहे. 

7/7

balaji wafers success story

7. बालाजी वेफर्सने देशाच्या अनेक भागात आपले प्लांट उभे केले आहेत आणि दररोज अनेक टन उत्पादन होते. मीडिया रिपोर्ट्स आणि विकिपीडियानुसार, 2020 पर्यंत बालाजी वेफर्सचा वार्षिक व्यवसाय सुमारे 3 हजार कोटींचा होता.