बँक चेकबुकवरील IFSC आणि MICR Code मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
What is MICR Code: बँकेच्या चेकबुक किंवा पासबुकवर IFSC आणि MICR कोड लिहिलेला असतो. हे कोड दोन्ही NEFT, IMPS आणि RTGS व्यवहारांसाठी आवश्यक आहेत. आयएफएसीचा फुल फॉर्म Indian Financial System Code असा आहे. एमआयसीआर कोड ही बँकिंग संज्ञा असून फुल फॉर्म Magnetic Ink Character Recognition आहे
What is MICR Code: बँकेच्या चेकबुक किंवा पासबुकवर IFSC आणि MICR कोड लिहिलेला असतो. हे कोड दोन्ही NEFT, IMPS आणि RTGS व्यवहारांसाठी आवश्यक आहेत. आयएफएसीचा फुल फॉर्म Indian Financial System Code असा आहे. देशभरातील बँकांच्या शाखेचा 11 कॅरेक्टरचा अल्फान्यूमेरिक कोड आहे. हा वेगवेगळ्या कोडने ओळखला जातो. एमआयसीआर कोड ही बँकिंग संज्ञा आहे. फुल फॉर्म Magnetic Ink Character Recognition आहे. हा नऊ अंकी युनिक कोड आहे जो ईएससी क्रेडिट स्कीममध्ये सहभागी होणाऱ्या बँकांना आणि शाखांना दिला जातो. RBI प्रत्येक बँकेच्या शाखेला एक अद्वितीय MICR कोड देते. हे चेक क्लिअरिंग प्रक्रियेत वापरले जाते. चेकच्या तळाशी मॅग्नेटिक इंक कोड बार असतात, हा एमआयसीआर कोड आहे आणि फक्त बँकच तो डीकोड करू शकते. हे कॅरेक्टर रिकग्निशन तंत्रज्ञानावर काम करते आणि त्याद्वारे शाखा ओळखली जाते.
MICR कोड IFSC कोडपेक्षा कसा वेगळा आहे?
IFSC कोड भारतात कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन किंवा इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्सफरसाठी वापरला जातो. तर, जागतिक स्तरावर निधी हस्तांतरित करण्यासाठी MICR कोड वापरला जातो. IFSC कोडमध्ये बँक कोड आणि शाखा कोड असतो, तर, MICR कोडमध्ये पिन कोड, बँक कोड आणि शाखा कोड असतो.
MICR कोड कधी आवश्यक आहे?
गुंतवणूक पोर्टफोलिओ, म्युच्युअल फंड आणि एसआयपी अर्ज यांसारखे कोणतेही आर्थिक साधन दाखल करताना तुम्हाला हा कोड आवश्यक आहे. MICR कोड बँकांच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम क्रेडिट व्यवहारासाठी बारकोडप्रमाणे काम करतो. बँकिंग प्रणालीमध्ये कागदावर आधारित कागदपत्रांची सत्यता आणि वैधता तपासतो.
बातमी वाचा- Income Tax Rule: तुमच्या कोणत्या कमाईवर कर आकारला जात नाही? जाणून घ्या
एमआयसीआर कोडमध्ये काय होते?
1. पहिले तीन अंक शहराच्या पिन कोडमधून घेतले जातात.
2. मधल्या तीन अंकांमध्ये बँक कोड आहे.
3. शेवटच्या तीन अंकांमध्ये शाखा कोड असतो.