१२ वर्षावरील मुलांना कधी मिळणार ZyCoV-D ची लस? पाहा कंपनीने काय दिली माहिती
ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अधिक घातक होण्याची भीती व्यक्त केली आहे.
मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शक्यता वर्तवली जात असताना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अधिक घातक होण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव डॉ.रेणू स्वरूप यांनी आशा व्यक्त केली आहे की ZyCoV-D लस चार आठवड्यांनंतर किशोरवयीन मुलांसाठी उपलब्ध होऊ शकते. ते म्हणाले की, आम्हाला सांगितले गेले आहे की, ही लस मुलांच्या लसीकरणासाठी बाहेर येण्यास सुमारे चार आठवडे लागणार आहेत.
अलीकडेच, फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिलाने म्हटले आहे की, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत लस Zycov-D ची पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे. कंपनी लवकरच त्याच्या किंमती देखील जाहीर करेल. महत्त्वाचं म्हणजे, झायडस कॅडिलाची ही देशी लस सुई नसलेली लस आहे. शुक्रवारी आपत्कालीन वापरासाठी औषध नियंत्रक जनरलने या लसीला मंजूर दिली होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही लस 12 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना देण्यासाठी वापरली जाऊ शकते.
अशा परिस्थितीत, देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेद्वारे (एनआयडीएम) इशारा देण्यात आला होता की, ही लस कोरोनाविरुद्ध एक मोठे शस्त्र बनू शकते. डॉ स्वरूप म्हणाले की, आम्हाला माहित आहे की भारत बायोटेकला पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लहान मुलांसाठी असलेल्या लसीच्या चाचणीसाठी आधीच परवानगी मिळाली आहे. त्याचप्रमाणे, जैविक-ई देखील त्याच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सध्या, अनेक कंपन्या मुलांसाठी लसीवर काम करत आहेत.