Adani Hindenburg Controversy : मार्केट रेगुलेटर सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच (Dhaval Buch) हे अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन खुलाशांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. अमेरिकन शॉर्ट सेलरने माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) आणि त्यांचे पती अदानीशी निगडीत विदेशी निधीमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला आहे. प्रथमच प्रकाशझोतात आलेले सेबी प्रमुखांचे पती धवल बुच कोण आहेत हे जाणून घेऊया?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धवल बुच हे सध्या ब्लॅकस्टोन या जागतिक खाजगी इक्विटी फर्मचे सल्लागार आणि भारतातील प्रमुख गुंतवणूकदार आहेत. याशिवाय ते अल्वारेझ आणि मार्सलमध्ये सल्लागार आहेत. ते गिल्डनच्या बोर्डावर एक गैर-कार्यकारी संचालक देखील आहेत. बुचच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी 1984 मध्ये आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. धवल बुच हे युनिलिव्हरचे कार्यकारी संचालकही होते. एवढंच नव्हे तर ते पुढे कंपनीचे मुख्य खरेदी अधिकारी झाले.


धवल बुच कोण आहेत? 


धवल बुच ब्लॅकस्टोन आणि अल्वारेज ऍण्ड मार्सलमध्ये वरिष्ठ सल्लागार आहेत. तसेच ते गिल्डनच्या बोर्डमध्ये देखील कार्यरत आहेत. बुच भारतीय प्रौद्योगिकी संस्था, दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. जेथून त्यांनी 1984 मध्ये मेकॅनिकल इंजीनियरिंग केली आहे. तसेच युनिलिव्हरमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. 


ब्लॅकस्टोनसह संघर्ष


बुच यांच्या सेबीच्या कार्यकाळात, धवल बुच यांची ब्लॅकस्टोन येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ब्लॅकस्टोन हा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) मध्ये मोठा गुंतवणूकदार आहे. हिंडेनबर्गचा दावा आहे की, बुच यांच्या नेतृत्वाखाली, SEBI ने असे अनेक बदल केले ज्यामुळे REITs ला फायदा झाला.


कंसल्टिंग व्यवसायात अडचण


हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, माधबी पुरी बुच यांच्याकडे सल्लागार कंपनी अगोरा ॲडव्हायझरीमध्ये 99 टक्के हिस्सा आहे. त्यांचे पती या कंपनीत संचालक आहेत.


आरोपांवर सेबी प्रमुख काय म्हणाले?


माधबी पुरी बुच आणि धवल बुच यांनी संयुक्तपणे एक निवेदन जारी करून हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “अहवालात केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपले जीवन आणि आर्थिक परिस्थिती खुल्या पुस्तकासारखी आहे. सर्व आवश्यक खुलासे गेल्या काही वर्षांत सेबीने आधीच केले गेले आहेत. कोणतीही आर्थिक कागदपत्रे उघड करण्यास आम्हाला कोणताही संकोच वाटत नाही….”