मुंबई : खरंच कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यावर अंत्यसंस्कार केल्याने COVID-19 चे संक्रमण पसरते. निधनानंतर व्यक्तीचा मृतदेह पुरल्याने विषाणू पसरतात का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत होते. यावर WHO रिपोर्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांनी काही उत्तर मिळाली आहे. कोलकातामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक प्रश्न उभे राहिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथे संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे तिथे पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या धापा परिसरात शुक्रवारी अजब घटना घडली. कोरोनामुळे सकाश नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सरकारकडून ठरलेल्या स्मशानभूमीत घेऊन जात होते. तेव्हा हजारोंच्या संख्येत नागरिक गोळा झाले. पोलिसांना या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण लोकं काही ऐकायला तयार नाही. नागरिकांच असं म्हणणं होतं की, निधन झालेला व्यक्ती हा कोरोनाग्रस्त होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले तर कोरोनाचे विषाणू दुसऱ्या लोकांना पण त्रास देतील. 


या घटनेतून दोन गोष्टी समोर येतात. जिथे सरकार लोकांना घरी राहण्याचं आवाहन करत आहे. पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नका असं सांगितलं जात आहे. तिथे लोकं मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे. 


तसेच दुसरा प्रश्न असा की, कोरोनाबाधित रूग्णावर अंत्यसंस्कार करायचे की नाहीत? 


१. जर कोरोनाबाधित व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे इलेक्ट्रिक मशीन किंवा सीएनजीमार्फत केले तर जाळताना तापमान हे ८०० ते १००० डिग्री सेल्सियसपर्यंत ठेवायचंय. या तापमानात कोणतेच विषाणू जिवंत राहत नाहीत. 


२. जर व्यक्तीला निधनानंतर पुरायचे असेल तर त्या जागेपासून पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत हा ३० मीटर दूर असावा जेणे करून कोणताच धोका निर्माण होणार नाही.