आगरतळा: औद्योगिक क्षेत्रात मजुरीचे काम करणारे लोक वगळले तर सरकारी कर्मचाऱ्यांना १ मे रोजी कामगार दिनाची सुट्टी का द्यावी, असा सवाल त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी उपस्थित केला आहे. सचिवालय कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बिप्लब देव यांनी म्हटले की, तुम्ही लोक मजूर आहात का? मी मजूर आहे का? मी मुख्यमंत्री आहे. तुम्ही सचिवालयातील कामकाज हाताळता. आपण काही औद्योगिक क्षेत्रातील मजूर नाही. त्यामुळे १ मे रोजी तुम्हाला सुट्टी का हवी?, असे त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारले. 


देशातील मोजक्याच राज्यांमध्ये ही सुट्टी दिली जाते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना १ मे ची सुट्टी का द्यावी? तो केवळ मजूरांचा हक्क आहे, असे बिप्लब देव यांनी सांगितले.