Viral Video : बायको माहेरी गेल्यावर पती घरात करत होता दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स, अचानक ती घरी आली अन्...
Extramarital affair Viral Video : बायको पाच दिवस माहेरी गेली म्हणून पती महाशयाने प्रेयसीला घरी राहण्यासाठी बोलवलं. पतीला संशय येतात ती त्यांना सरप्राईज देण्यास पोहोचली अन् मग...
Husband Wife Viral Video : बायको माहेरी गेली तर या पती महाशयाने जे केलं त्यानंतर त्याचा हिमतीची दाद द्यायला हवी. या महाशयाने चक्क आपल्या प्रेयसीला घरी राहिला बोलवलं. कनिष्ठ अभियंत्याचा हा प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झालं असं की या व्यक्तीचा पत्नी पाच दिवसांसाठी माहेरी राहिला गेली होती. मग काय या पतीरायाने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं. सरकारी निवासस्थानी हे दोघे राहिला लागले. रोमान्स आणि रोमँटिक क्षणांचा अनुभव हे दोघे त्या घरात पुरेपूर घेत होते. माहेरी असलेल्या पत्नीला आपल्या नवरा कामात असेल आणि घरी आल्यावर थकून झोपत असेल असं वाटायचं.
पण तिच्या विश्वासाला आणि प्रेमाला हा व्यक्ती क्षणा क्षणाला नेस्तनाबूत करत होता. लग्नाच्या वेळी दिलेल्या सात वचन हा व्यक्ती प्रेमात विसरला होता. लग्न आणि विश्वास हे फक्त शब्दच राहिली आहेत असं वाटतं. काही दिवसांनी पत्नीला नवऱ्याच्या वागण्यावर संशय यायला लागला. तिने भावाला नवऱ्याच्या वागण्याची कल्पना दिली. या दोघींनी पतीला सरप्राईज देण्याचं ठरवलं आणि हे काय ते दोघे थेट घरी पोहोचली. (wife Caught red handed engineer husband living with another woman video viral on Internet today google trend)
दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करताना पत्नीने त्याला रंगेहात पकडलं. नवऱ्याचे कारनामे पाहून पत्नीने रौद्ररुप धारणं केले तर भावाने नात्याचा विचार न करता बहिणीच्या नवऱ्याला लाथाबुक्यांचा प्रसाद दिला. बहिणीशी विश्वासघात केल्याच पाहून त्याने त्या व्यक्तीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील बइराइच जिल्ह्यातील असून हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. khabriduniya या अकाऊंटवर वापरकर्त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लग्न ही जबाबदारी आहे, नातं हे दोघांचं असतं. या दोघांमध्ये जेव्हा तिसरा येतो. तेव्हा या संसाराला तडा जातो. प्रत्येक नातं हे विश्वास आणि प्रेमावर उभं असतं. पण जेव्हा बायकोच्या पाठीमागे नवरे असे कारनामे करतात. तेव्हा विश्वास नक्की कोणावर आणि कसा ठेवावा असा प्रश्न पडतो. हाताची पाचही बोट सारखी नसतात. पण एका बोटामुळे इतर बोट नाहक बदनाम होतं.