महिला लग्नानंतर नवऱ्यासंदर्भात `या` गोष्टी इंटरनेटवर करतात सर्च!
नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं समोर आलंय की, लग्नानंतर बहुतेक महिला गुगलवर काय सर्च करतात.
मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून गुगल हे जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर Google कडे असतं असा लोकांचा विश्वास आहे. प्रत्येकजण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गुगलची मदत घेतात. पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं समोर आलंय की, लग्नानंतर बहुतेक महिला गुगलवर काय सर्च करतात. हा निकाल पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
लग्न झालेल्या महिलांची अशी असते सर्च हिस्ट्री
गुगलच्या एका डेटानुसार, विवाहित महिला नवऱ्याला काय आवडतं हे शोधण्यासाठी या सर्च इंजिनवर सर्च करतात. लग्नानंतर जगातल्या प्रत्येक स्त्रीला अनेकदा प्रश्न पडतो की तिच्या नवऱ्याला काय आवडतं. याशिवाय पतींची चॉईस काय आहे आणि त्यांना काय आवडतं, काय नापसंत आहे हे पाहणंही महिलांना आवडते. हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च केला जातो. याशिवाय स्त्रिया आपल्या पतीचे मन कसं जिंकायचं, त्यांना कसं आनंदी ठेवायचं याचा शोध घेतात.
अनेक वेळा महिला गुगलला विचित्र प्रश्नही विचारतात. सर्वात धक्कादायक बाब समोर येते ती म्हणजे, आपल्या पतीला जोरूचा गुलाम कसा बनवायचा. याशिवाय बायका देखील सतत शोधतात की, लग्नानंतर त्यांना मूल होण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे. सहसा बायकांना हे टेन्शन अनेकदा येतं.
इंटरनेटवर शोधले जाणारे काही प्रश्न
स्त्रियांना हे जाणून घ्यायचं असते की, त्यांनी लग्नानंतर त्यांच्या नवीन कुटुंबात कसं वागले पाहिजे, त्या कुटुंबाचा, सासरचा भाग कसा बनू शकतात.
कुटुंबाची जबाबदारी कशी उचलावी
लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा चालवायचा आणि व्यवसायासोबत संसार कसा सांभाळायचा