नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभेत उद्या-शनिवारी दुपारी ४ पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर, भाजपाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने म्हटलं आहे, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू. कर्नाटकसाठी भाजपाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच येडियुरप्पा यांनी देखील आपण बहुमत सिद्ध करू असं म्हटलं आहे.  मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपा खरोखर बहुमत सिद्ध करू शकणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तरीही भाजपा शक्ती प्रदर्शनासाठी तयार असल्याचं, प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात सु्प्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उद्याच बहुमत चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी गुप्त मतदान घ्या, असंही सर्वोच्च न्यायालयाने बजावलं आहे.कर्नाटकात भाजपकडे 104 आमदार आहेत, काँग्रेसकडे 78 आमदार, तर जेडीएस यांच्याकडे 38 आमदार आहेत, अपक्ष 2 निवडून आले आहेत. बहुमत गाठण्यासाठी ११२ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.


कर्नाटकात येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे, तसेच येडियुरप्पा हे जरी सध्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी असले, तरी सुद्धा त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. येडियुरप्पा यांना उद्या आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.