नववधू लग्नानंतर गुगलवर काय सर्च करतात, वाचून धक्का बसेल
तुम्हीपण वाचून व्हाल थक्क असा आहे हा अहवाल.
मुंबई : गुगल आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. हल्ली आपल्याला कोणतीही माहिती किंवा गोष्ट हवी असल्यास सर्वात आधी गुगलवर सर्च करतो. पण तुम्हाला माहितेय का एका रिपोर्टमध्ये नवविवाहित वधू गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात ? याचा अहवाल समोर आला आहे. तुम्हीपण वाचून व्हाल थक्क असा आहे हा अहवाल. (You will be shocked to read what brides search on Google after marriage nz)
पतीला खुश कसे ठेवावे:
लग्नानंतर मुलीला तिच्या सासरमधील लोकांना खूश ठेवण्याचे आव्हान असते. घरातील लोकांना ती वेगवेगळ्या पद्धतीने खूश करेल पण नवऱ्याला खूश कसं करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न तिच्यासमोर असतो. त्यामुळेच पतीच्या पसंद ना पसंदची विशेष काळजी तिला घ्यावी लागते. म्हणूनच नवविवाहित नववधू पतीला खुश कसे ठेवावे हे सर्वात जास्त सर्च करतात.
आणखी वाचा - Instant Glow : दिवाळीत चेहरा उजळेल लख्ख.. घरच्या घरी करा हे दही फेशियल...
पतीला कसे आकर्षित करावे:
लग्नानंतर प्रत्येक मुलींची हि इच्छा असते कि तिचा पती नेहमी तिच्याकडे आकर्षित व्हावा. त्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करत असते. त्यातलाच एक प्रयत्न म्हणून ती पतीने तिच्याकडे आकर्षित होण्यासाठी गुगलवर सर्च करत असते.
पतीचे मन कसे जिंकायचे:
नातं अनोळखी असल्यामुळे मन जिंकण्याचा प्रश्न असतो. पतीचे मन जिंकणे हे मोठं आव्हान तिच्यासमोर असते.
सासरच्या सदस्यांना खुश कसे ठेवावे:
एखादी नववधू जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्यासमोर खूप प्रश्न असतात घराला समजणे. आपली जबाबदारी पूर्ण करणे हे कठीण काम असते. नववधू आपल्या कुटुंबाची जबाबदारी कशी सांभाळावी याबद्दल गुगलवर सर्च करतात. नववधूही सासरच्या सदस्यांना खुश ठेवण्याचे ऑप्शन देखील सर्च करतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)