मुंबई : शिधापत्रिकेमुळे (Ration Card) सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं. शिधापत्रिकेचा अन्नधान्य रास्त दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच. त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणूनही रॅशन कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. (your name is in the ration card or not know how to check)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही, तर पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँक खातं उघडण्यासाठीही रॅशन कार्डाचा पुरावा म्हणून उपयोग होतो. आधार कार्ड नसल्यास शिधापत्रिकेचा पुरावा म्हणून वापरता येतं.


मात्र अनेकदा विविध कारणांमुळे शिधापत्रिकेतून नाव वगळंल जातं. अशा वेळेस सर्वसामांन्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. घरबसल्या शिधापत्रिकेत नाव आहे की नाही, हे कसं तपासायचं याबाबत आपण जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला (NFSA) एनएफएसच्या वेबसाईटवर जावं लागेल.


अशी आहे प्रक्रिया


- https://nfsa.gov.in/Default.aspx या वेबसाईटवर जा


- Ration Card या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याखालील Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा.  


-राज्य आणि जिल्हा निवडा. 


- जिल्हा निवडल्यानतंर तुम्हाला तुमच्या विभागीय शिधापत्रिका कार्यालयाचं नाव निवडावं लागेल. तसेच तुमचं रॅशन कार्डचा प्रकार निवडावा लागेल. उदा,. केशरी, बीपीएल. 


- यानंतर तुम्हाला शिधापत्रकधारकांची एक यादी दिसेल. या यादीत तुम्ही तुमचं नाव आहे की नाही, हे पाहू शकता. ही यादी तुम्ही डाऊनलोडही करु शकता.