Love Affair News: प्रेमात पडायला वयाची मर्यादा नसते असं म्हणतात. पण कधीकधी तेच प्रेम अंगलट येते आणि नको ते घडून बसतं.  नात्याला काळिमा फासणारा एक प्रकार समोर आला आहे. करोना लॉकडाऊनच्या काळात ल्युडो खेळता खेळता जावई चुलत सासूच्या प्रेमात पडला. इतकंच नव्हे, तर ते दोघं प्रेमात आकंठ बुडाले होते की तब्बल तीन वर्ष त्यांच्यात अनैतिक संबंध होते. (Extra Marital Affairs) जावई सासूला भेटायला रोज रात्री गुपचूप येत होता. मात्र, त्याचवेळी घडलं असं काही की सगळेच गोंधळले. (Crime News In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार राज्यातील ही घटना आहे. जमुई जिल्ह्यातील एका युवतीसोबत तरुणाचे लग्न झाले होते. दोघे पती-पत्नी त्यांच्या संसारात खुष होते. प्रेमी युवकाला करोना लॉकडाऊनच्या काळात ल्युडो खेळण्याची सवय लागली. ल्युडो खेळता खेळता पत्नीच्या काकीसोबत त्याचा संपर्क झाला. त्यानंतर ते दोघ रोज ऑनलाइन ल्युडो खेळू लागले. दोघांमधील बोलणं वाढलं नंतर मैत्रीही झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं दे देखील त्यांना कळलं नाही. पत्नीची काकी विधवा असल्याचं त्याला माहिती होतं. तरीही त्याने तिच्यासोबत ओळख वाढवली. दोघांमध्ये ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 


गोव्याला जायचा बेत आखताय, सरकारने पर्यटकांना दिली Good News, लगेच जाणून घ्या


प्रेमी युवक अनेकदा रात्रीच्या अंधारात सासूला भेटण्यासाठी येत होता. बुधवारच्या रात्रीही तो महिलेला भेटण्यासाठी आला होता. मात्र, त्याच्यावर आधीपासून काही जण लक्ष ठेवून आहेत याची त्याला काहीएक खबर नव्हती. सासूला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्यानंतर एका व्यक्तीने याची माहिती गावकऱ्यांना दिली. दोघंही एका घरात असताना गावकऱ्यांचा जमाव तिथे पोहोचला आणि दोघांना रंगेहात पकडले. 


सासू आणि जावयाला एकत्र पाहून कुटुंबीयांचा व गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. गावातील तरुणांनी जावयाला एका ठिकाणी बांधून ठेवून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी तरुणाची गंभीर अवस्था पाहून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाबाबत माहिती देत तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. 


12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?


पोलिसांनी तरुणाची नाजूक अवस्था पाहत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पत्नीच्या कुटुंबीयानी दिलेल्या निवेदनानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, सदर महिलेबाबत कुटुंबीयांनी काय निर्णय घेतला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.