Night Bus Service in Goa: मे महिन्याची सुट्टी नुकतीच सुरू झाली आहे. (Vaccation) आत्तापासूनच सगळ्यांनी पिकनिकचा बेत आखला असेल. देशातील पर्यटकांचे आणि खवय्यांचे भटकंतीचे आवडते ठिकाण म्हणजे गोवा (Goa Tourist). गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी (Goa Tourism) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पर्यटकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर १ जूनपासून गोवा सरकारने (Goa Government) काही कठोर नियम लागू करणार असल्याचेही म्हटलं आहे. (Night Bus Service in Goa)
गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्यादृष्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोव्यात परिवहन व्यवस्था सुरु करण्याच्या उद्दिष्टाने राज्य सरकारच्या ताफ्यात जुलैपर्यंत १०० अत्याधुनिक बस दाखल होणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी २० इलेक्ट्रिक बसना हिरवा झेंडा दाखवला आहे. या बसमुळं आता पर्यटकांना रात्री उशीरापर्यंत गोव्यात फिरता येणार आहेत. लवकरच ही सुविधा सुरु केली जाणार आहे.
12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?
गोव्यात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था रात्री ८वाजता बंद होते. राजधानी पणजीव्यतिरिक्त राज्यातील इतर महत्त्वपूर्ण शहरांत सार्वजनिक व्यवस्था रात्री ८नंतर पूर्णपणे बंद असतात. याचा फटका गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सर्वाधिक बसतो. त्यामुळं आगामी दोन महिन्यांसाठी कदंब आगारात राज्य परिवहन विभागाच्या १०० बस दाखल होणार आहेत.
गोव्यात दळवळणाची सुविधा सोप्पी व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताफ्यात दाखल होणाऱ्या सार्वजनिक बस या एकाच रंगात असणार आहेत.
जगातील सर्वात उंच शिव मंदिराला धोका?, १२,८०० फुट उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर ६ अंशाने झुकले
गोव्याला देशात उत्तम पर्यटनाचे राज्य बनवणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. अशावेळी वाहतूक व्यवस्थेत कमतरता राहू नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही विचार होईल, यासाठी आम्ही काम करत आहोत. राज्यात पर्यटन वाढल्यास उद्योगालाही चालना मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गोवा सरकार आता कठोर कारवाई करणार आहे. १ जूनपासून गोव्यात नवीन नियम लागू होणार आहे. परिवहन मंत्री महावहिन गुडिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मेपर्यंत राज्यातील मुख्य रस्त्यांवर राज्य सरकार सीसीटीव्ही कॅमेऱ्या बसवणार आहेत. यामुळं नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. तसंच, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवरही कारवाई करण्यात येआल. कारवाईनंतर ऑनलाइन किंवा थेट दंड वसूल करण्यात येईल.