12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News: 12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, मुलीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मयत मुलीच्या मैत्रिणीच्या पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. 

Updated: May 17, 2023, 03:12 PM IST
12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं? title=
Accidental death of 12-year-old girl, a case has been registered against the parents of her friend

मुंबईः दोघी मैत्रिणी स्कुटरवरुन फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडल्या आणि मोठा अपघात घडला. (Accident In Mumbai) स्कुटरवर मैत्रिणीच्या मागे बसलेल्या १२ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर गुन्हा मात्र पालकांवर दाखल करण्यात आला आहे. मुलुंड येते ही घटना घडली आहे. (Mumbai News Today)

१६ वर्षांच्या मुलीला दुचाकी चालवायची परवानगी देणं पालकांना महागात पडलं आहे. मुलीच्या अपघातानंतर तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड मध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीने आपल्या मैत्रिणीसोबत फेरफटका मारण्यासाठी वडिलांकडून स्कुटीची चावी घेतली. ही सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत बारा वर्षांची दिशा या दोघी मुलुंडच्या केळकर कॉलेज परिसरात असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्यावर स्कुटी चालवत होत्या. त्यावेळी अचानक स्पीड ब्रेकर वरून स्कुटी स्लिप होऊन थेट डिव्हायडरला जाऊन धडकली.

अल्पवयीन मुलीच्या हातात स्कुटीची चावी

अपघात इतका भीषण होता की ज्यामध्ये मागे बसलेल्या बारा वर्षांच्या दिशा हिचा जागीच मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत वाहन परवाना मिळविण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे, कोणताही परवाना नसताना १६ वर्षांच्या मुलीला स्कुटी चालवायची परवानगी दिल्याबाबत दिशाच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीचे वडील अमर डोंबे यांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. 

हेसुद्धा वाचा: जगातील सर्वात उंच शिव मंदिराला धोका?, १२,८०० फुट उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर ६ अंशाने झुकले

वडिलांविरोधात गुन्हा

अमर डोंबे यांनी आपली मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला गाडी चालवण्याची परवानगी दिली. त्यामुळे अमर डोंबे हेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप दिशा हिच्या वडिलांनी केला आहे. त्यानुसार आता नवघर पोलिसांनी मोटर वाहन अॅक्ट अंतर्गत नवघर पोलीस ठाण्यात अमर डोंबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन मुलांच्या हातात सर्रास दुचाकीचे हँन्डल

सध्या सर्रास १५ ते १८ वयोगटातील मुलं वाहन परवाना नसतानाही दुचाकी चालवताना निदर्शनास येते. वेगात गाड्या चालवल्यामुळं अपघातांचे प्रमाणही वाढते. अनेक मुले ही अतिशय वेगात गाड्या चालवून अपघातांना आमंत्रण देतात.

हेसुद्धा वाचाः मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण

हेल्मेटच्या नियमांकडे कानाडोळा

मुंबईमध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक विभागाच्या या निर्णयाकडे पौढांसह तरुणांकडूनही कानाडोळा करण्यात येतो. अपघात टाळण्यासाठी व  प्रवाशाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट अत्यंत गरजेचे आहे. मात्र, या नियमाचे पालन होताना अजूनही दिसत नाही.