झी एंटरटेनमेंट आणि गिव्ह इंडियाचा खास उपक्रम; देशातल्या 30 हुशार मुलींना मिळाली विशेष स्कॉलरशीप
बॉर्न टू शाईन उपक्रमातून 30 हूशार मुलींना मिळाली विशेष स्कॉलरशीप
मुंबई : झी एंटरटेनमेंट (Zee Entertainment) आणि गिव्ह इंडियाच्या (Give India) बॉर्न टू शाईन (Born to shine) या उपक्रमातून देशभरातील 30 हुशार मुलींना 4 लाख रूपयांची विशेष स्कॉलरशीप आणि तीस महिन्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम देऊन सत्कार करण्यात आला आहे. देशभरातील 8 शहरातून या मुलींची निवड करण्यात आली होती. या संबंधित कार्यक्रम रविवारी मुंबईत पार पडला आहे.
देशात विज्ञान, गणित आणि क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शिष्यवृत्ती (scholarship) कार्यक्रम राबविले जातात. मात्र कला क्षेत्रात बाबत तसे अजिबात होत नाही आहे. त्यामुळे कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बॉर्न टू शाईन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
आजही आपल्या देशाच्या बहुतांश भागात मुलींच्या महत्त्वाकांक्षा कलाक्षेत्रातील त्यांची आवड याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे या कलाक्षेत्रातील प्रतिभावंत मुलींची शोध घेता यावा यासाठी बॉर्न टू शाईन हा उपक्रम सुरु करण्याता आला आहे.
बॉर्न टू शाईन (Born to shine) या उपक्रमात गेल्या एका वर्षात देशभरातील कला क्षेत्राशी निगडित 5000 हून अधिक मुलींनी या सन्मानासाठी अर्ज केला होता. या अर्जामधून हूशार मुलींना निवडण्यासाठी 5 दिग्गजांची ज्यूरी बसली होती. या ज्यूरीमध्ये झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत गोयंका यांच्यासह स्वदेश फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अँड डायरेक्टर जरीना स्क्रूवाला, सुब्रमण्यम अकादमी ऑफ़ परफार्मिंग आर्ट्स (SaPa) च्या फाउंडर CEO डॉ. बिंदू सुब्रमण्यम, CARER च्या फाउंडर CEO समारा महिंद्रा, ब्रह्मनाद कल्चरल सोसाईटीचे फाउंडर रूपक मेहता होते.
या अर्जामधून 5 दिग्गजांच्या विशेष ज्युरीने वेगवेगळ्या फेऱ्यांनंतर शेवटच्या 30 हुशार मुलींची निवड केली. या मुली देशातील 8 शहरांमधून निवडल्या गेल्या होत्या. या मुलींचा आज मुंबईत 4 लाख रुपयांची शिष्यवृत्ती आणि 30 महिन्यांसाठी मार्गदर्शन देऊन सत्कार करण्यात आला. झी एंटरटेनमेंट (Zee Entertainment) आणि गिव्ह इंडियाच्या (Give India) बॉर्न टू शाईन (Born to shine) या उपक्रमातून आता या 30 मुलींच्या स्वप्नांना आणखीण बळ मिळणार आहे.