Aniket Kay Khanar Instagram Videos: सोशल मीडियावर पाककृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या शेफमध्ये अनेक नावं घेता येतील. यामध्ये अगदी संजीव कपूर यांच्यापासून रणबीर ब्रारपर्यंतची नावं घेता येतील. कोरोनाच्या कालावधीमध्ये तर महाराष्ट्रातील घराघरात मधुराज रेसिपी हे चॅनेल प्रचंड लोकप्रिय झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात मधुराज रेसिपीवरुन अनेकांनी घरच्याघरी बरेच प्रयोग करुन पाहिले. मात्र मागील काही काळापासून सोशल मीडियावर आणि खास करुन इन्स्टाग्रामवर एक जोडपं रेसिपींसाठी प्रचंड लोकप्रिय झालं आहे. हे जोडपं कोणतं हे सांगण्यासाठी एक वाक्य पुरेसं आहे. ते म्हणजे, 'अनिकेत, आज काय खाणार?'


हे दोघे कोण समजलं असेलच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय हे वाक्य वाचून आला काही नाही डोळ्यासमोर अनिकेतचा हसरा गुटगुटीत चेहरा? कंप्युटरवर काम करणाऱ्या अनिकेतला काय खाणार असं विचारत अगदी उत्तम शाकाहारी पदार्थांपासून मांसाहारी पदार्थांपर्यंत अनेक पदार्थ तयार करुन खाऊ घालते. अनिकेतच्या पत्नीकडून रोज त्याला कोणकोणते चमचमीत पदार्थ खायला मिळतात हे 'कुक इन शॉर्ट' (Cookininshort) नावाने अकाऊंट चालवणाऱ्या अनिकेतच्या बायकोच्या रेसिपी पाहून समजतं. अल्पावधीत अनिकेत आणि त्याची अन्नपूर्णा असलेला पत्नी हे जोडपं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. या व्हिडीओंच्या सुरुवातीला कामात मग्न असणारा आणि काय खाणावर विचारल्यावर चेहऱ्यावर मोठं हसू आणत पदार्थाचं नाव सांगणारा अनिकेत आणि नंतर रेसिपी बनवताना त्याची पत्नी असे दोघेच दिसतात. 


हे व्हिडीओ कोण शूट करतं?


या दोघांची रेसिपी सांगण्याची ही स्टाइल नंतर इन्स्टाग्रामवर अनेकांनी कॉपी केली. त्यांची खिल्लीही उडवली. सकारात्मक असो किंवा नकारात्मक पब्लिसीटी इज पब्लिसीटी म्हणतात त्याप्रमाणे या दोघांनी या टीकेकडे आणि नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत काम सुरु ठेवलं आहे. दरम्यान, हे व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना एक प्रश्न कायम पडतो तो म्हणजे हे व्हिडीओ शूट कोण करतं? तर या प्रश्नाचं उत्तर अनिकेतच्या पत्नीनेच दिलं आहे. 



अनिकेतच्या पत्नीनेच सांगितलं कॅमेरामनचं नाव


आता श्रावण आणि त्यानंतर दसरा संपल्यामुळे या दोघांनी शूट केलेल्या व्हिडीओंपैकी मांसाहारी रेसिपीजचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशाच एका मटण लॉलीपॉपच्या रेसिपीच्या व्हिडीओखाली कमेंटमध्ये एकाने अप्रत्यक्षपणे कॅमेरामन कोण असं विचारलं. अभिषेक इंदुलकर नावाच्या तरुणाने अनिकतेच्या पत्नीच्या या रेसिपीच्या व्हिडीओवर, 'कॅमेरामनला सुद्धा काहीतरी द्या' असं म्हटलं. त्यावर अनिकतेच्या पत्नीने, 'तोच आहे कॅमेरामन' असं उत्तर कमेंट करुन दिलं. म्हणजे अनिकतेची पत्नी या हे छान छान पदार्थ बनवत असताना अनिकेतच तिथे उभा राहून व्हिडीओ शूट करत असतो. 



अनेक व्हिडीओंच्या कमेंटमधून कौतुकाची थाप


दरम्यान, याच व्हिडीओवर अनिकेतच्या पत्नीला फार छान छान प्रतिक्रियाही देण्यात आल्या असून त्यावरही तिने रिअॅक्ट केलं आहे. विशेष म्हणजे मजेदार प्रतिक्रियाही अनिकेतच्या पत्नीने स्पोर्टींगली घेतल्याचं दिसत आहे.