Baba Maharaj Satarkar on Successful Life : ज्येष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. (Baba Maharaj Satarkar Death at 89 Age) नेरुळमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबामहाराज सातारकर यांनी कायमच आपल्या चिंतनाने लोकांना मार्गदर्शन केले आहे. बाबामहाराज सातारकर यांनी संत परंपरा आपल्या किर्तनातून जपली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबामहाराज सातारकरांनी अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लोकांचे प्रबोधन केले. आनंदी राहण्यासाठी काय करावे? आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे? यासारख्या अनेक विषयांवर बाबामहाराज सातारकर यांनी मार्गदर्शन केले. आपल्या अनोख्या शैलीत कायम बाबामहाराज सातारकर प्रबोधनाचे काम करत असतं. 


बाबामहाराज सातारकर यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं? या किर्तनात त्यांनी यशाचे रहस्य उलघडलं. यशस्वी होण्यासाठी सतत परमेश्वराच्या स्मरणात असणे गरजेचे असते. त्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे 


विचार चांगले ठेवा चांगलचं होणार


बाबामहाराज सातारकर सांगायचे की, विचार चांगले ठेवा चांगलच होणार. विचारच तुमच्या यशस्वी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. बाबामहाराज आपल्या किर्तनातून कायम या वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणाने बोलायचे. विचारांची ताकद खूप महत्त्वाची असल्याचं ते आपल्या किर्तनातून सांगत. 


आयुष्य बदलवणारे सुंदर विचार 


विचार तुमचे संपूर्ण आयुष्य बदलवू शकतात. याकरता सुंदर विचार, सकारात्मक विचार, परमेश्वराचे स्मरण करणारे विचार अतिशय महत्त्वाचे ठरतात. अशावेळी या विचारांचे भान कसे घ्यायचे हे समजून घेणे गरजेचे असते. 


'मी' पण नसावा 


जीवनात कितीही यशस्वी झालात तरी मी पणा नसावा. मी पणाच्या मागे अहंकार, क्रोध, उद्धट पणाची भावना आहे. यामुळे जीवनात यशस्वी होणे कठीण होते. अशावेळी मी पणा नसावा असे बाबामहाराज सातारकर आपल्या किर्तनात सांगतात. 



'मी' च्या मागे कोण?


बाबामहाराज सातारकर सांगतात की, आपण जीवनात यशस्वी होत असताना आपल्यामागे कोण आहे? मीच्या मागे कोण आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे. मीच्या मागे परमेश्वर आहे. सतत परमेश्वराचे स्मरण असावे असं बाबा महाराज सातारकर आपल्या किर्तनातून सांगतात. कोणतंही यश संपादन करताना कायम परमेश्वराचं स्मरण राहावं, असं देखील ते सांगतात. 


परमार्थ म्हणजे काय?


प्रभूवर प्रेम करणे म्हणजे परमार्थ नव्हे तर प्रभूच्या प्रेमाची प्रचिती घेणे म्हणजे परमार्थ, असं बाबामहाराज सातारकर यांच हे विधान तुम्हाला परमेश्वराची खरी प्रचिती करून देते. परमार्थ काही आगळा वेगळा नाही तर तो जीवन जगत असताना परमेश्वराच्या स्मरणात केला जातो. यामुळेच तुम्ही यशस्वी जीवन जगू शकता यात शंक नाही.