World's Most Dangerous Bird: ऑस्ट्रेलियातील लोकांना समुद्र किनाऱ्यावर सर्वात धोकादायक पक्षी दिसला आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारण म्हणजे कोणता पक्षी पाण्यात जाऊ शकतो याचा विचार आजवर कोणी केला नसेल पण आता या पक्षाला समुद्रात जाताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. सगळ्यात आधी जेव्हा त्यांनी या पक्षाला समुद्रात पाहिले तेव्हा त्यांना वाटलं की हे शार्कचं फिन असेल. त्यानंतर वाटलं की कासव असले, त्यानंतर त्यांना आणखी अनेक जलचर आठवले. पण जेव्हा त्यांनी या पक्ष्याला पाहिले तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पक्षी कोणता आहे? तर या पक्ष्याचे नाव कॅसोवेरी (Cassowary) असं आहे. आता हा कोणता पक्षी आहे कसा दिसतो आणि त्याच्या विषयी आणखी काय माहिती आहे हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पक्ष्याला जर तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला तो पटकन शहामृगासारखा दिसतो. तर कोणाला एमू सारखा. हा पक्षी खूप उंच असतो. त्याच्या पायात खूप ताकद असते. त्याशिवाय त्याचा पायाची बोटं ही टोकदार असतात. कॅसोवेरी हा पक्षी असला तरी तो उडू शकत नाही. 


कोणत्या प्रदेशात आढळतो हा पक्षी?


कॅसोवेरी हा पक्षी मुख्यत: पापुआ न्यू गिनी, पश्चिमी पापुआ, अरु आयर्लॅंड आणि उत्तर पूर्व ऑस्ट्रेलिया या परिसरात आठळतो. या पक्ष्याच्या तीन प्रजाती या संपल्या आहेत. सध्या सगळ्यात जास्त कोणत्या जातीतील कॅसोवेरी हे पक्षी असतील तर ते दाक्षिणात्य कॅसोवेरी आहेत. दाक्षिणात्य कॅसोवेरी हा पक्षी जगातील सगळ्यात जास्त उंच आणि सगळ्यात जास्त वजन असणाऱ्या पक्षांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या पेक्षा मोठे कोणते पक्षी असतील तर ते फक्त शहामृग आणि एमू आहेत. 


काय खातात कॅसोवेरी? 


कॅसोवेरी हे साधारणपणे फळ खातात. पण गरज भासल्यास मासे, उंदीर, छोट्या जनावरांचा शिकार देखील करतात. अनेकदा तर ते पाल, बेडूक आणि साप देखील खातात. कॅसोवेरी खूप चांगल्या प्रकारे पाण्यात पोहतात. त्यामुळे त्यांना जलचरांचा शिकार करायला खूप सोपं जातं. 


नर कॅसोवेरी मादीच्या तुलनेत कमी आक्रमक असतात. मादी सगळ्यात जास्त धोकादायक असतात. मोठा कॅसोवेरी नर हा 4.11 फूट ते 5.11 फूट उंच असतो. तर मादी ही 6.6 फूट उंच असते. या पक्षाचे वजन हे जवळपास 60 किलो पर्यंत असते. याशिवाय कॅसोवेरी यांच्या पंज्याला तीन बोटं असतात. बोटांची नखं ही खूप टोकेरी असतात. कॅसोवेरी हे 50 किमी प्रतितासच्या वेगानं धावतात. जर त्यांनी त्यांच्या पंज्यानं आपल्याला धक्का दिला तर आपण अनेक फूट लांब जाणून पडू शकतो. याशिवाय आपल्याला खूप जखमा होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर ते 4.11 उंच उडी मारू शकतात. 


सगळ्यात धोकादायक पक्षी


आता फक्त क्वीन्सलॅन्डमध्ये 4 हजार कॅसोवेरी आहेत. कॅसोवेरी या पक्षाचे नाव नेचर कंजरवेशन ॲक्ट 1992 नुसार सगळ्यात धोकादायक पक्ष्यांच्या यादीत आहे. या पक्ष्यांना सगळ्यात जास्त भीती ही गाड्यांची धडक, श्वान आणि माणसांपासून असतो. तर ऑस्ट्रेलियातील लोकांना यांच्या जवळ जाण्यापासून थांबवण्यात येते. कॅसोवेरी हे कधीच माणसांवर हल्ला करत नाही. पण 2006 मध्ये समोर आलेल्या अभ्यासात असं समोर आलं की 221 वेळा कॅसोवेरी यांना हल्ला केला. ज्यातील 150 वेळा हल्ला त्यांनी माणसांवर केला. यापैकी 75 टक्के हल्ले हे माणसांवर होते. त्यातही हे तेच माणसं आहेत ज्यांनी कॅसोवेरी यांनी काही खायला देण्याचा प्रयत्न केला.