Snacks Recipes: आता काहीच दिवसात पितृपक्ष संपेल आणि नवरात्रीचा सण सुरु होईल. यंदा ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर असा हा सण असेल. नऊ दिवस चालणाऱ्या या सणामध्ये देवीची मनोभावे पूजा केली जाते. या काळात अनेक भक्त उपवास करतात. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार काही लोक पहिला आणि शेवटचा दिवस उपवास करतात तर काही संपूर्ण ९ दिवस उपवास करतात. उपवासात नऊ दिवस फक्त फळं खाऊन उपवास केला जातो. परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक असलेल्या शरीराच्या उर्जेसाठी आरोग्यासाठी पदार्थांचीही गरज असते. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फराळी भेळेची रेसिपी. चला टेस्टी आणि हेल्दी फराळी भेळ कशी बनवायची हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय साहित्य आवश्यक आहे? 


  • एक कप शेंगदाणे

  • एक कप बदाम

  • एक कप काजू

  • एक कप मखाना 

  • १/२ कप नारळाचे पातळ काप

  • दोन-तीन हिरव्या मिरच्या

  • अर्धा टीस्पून जिरे

  • अर्धा चमचे सेंधा मीठ

  • अर्धा टीस्पून काळी मिरी

  • अर्धा टीस्पून साखर

  • एक चमचा तूप


जाणून घ्या कृती 


  • फराळी भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात मखाना , शेंगदाणे, बदाम आणि काजू घालून छान परतून घ्या. 

  • आता कढईत नारळाचे पातळ काप घालून सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्या. हे सर्व साहित्य कढईतून बाहेर काढा.

  • आता त्याच कढईत थोडं तूप गरम करून त्यात जिरे घालून छान परतून घ्या, त्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. 

  •  नंतर भाजलेले आधी भाजेले काजू आणि मखाना घाला.  या मिश्रणावर वरून मीठ, काळी मिरी आणि हवी असल्यास साखर घालून मिक्स करा. 

  • हे मिश्रण मंद आचेवर छान परतून घ्या.

  • अशाप्रकारे तुमची फराळी भेळ तयार आहे. ही भेळ थंड करून हवाबंद डब्यात स्टोअर करा आणि नवरात्री उपवासाच्या वेळी याचे सेवन करा.