Jaya Kishori Tips for Parents : मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी कायमच चर्चेत असते. अनेकदा ते आपल्या लेक्चरमधून मार्गदर्शन करत असतात. रिलेशनशिप ते पॅरेंटिंग टिप्सवर कायमच मोकळेपणाने बोलताना जया किशोरी दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आताच्या धावपळीच्या जीवनात पालकांना आपलं मुलं हे लहानपणापासूनच अगदी सक्षम आणि स्वावलंबी असावं असं वाटत असतं. पण अशा परिस्थितीत काय करावं हे त्यांना कळत नाही. अशावेळी जया किशोरी यांनी दिलेला सल्ला पालकांना उपयुक्त ठरतो. 


जया किशोरी यांच्या पॅरेंटिंग टिप्स 


जया किशोरी सांगतात की, लहान मूल सुरुवातीला बोबड्या बोलांनी शिवीगाळ करतात किंवा अपशब्द काढतात. तेव्हा घरातील मंडळी खूप हसतात. तिथेच पालक आणि घरातील इतर मंडळी चूक करतात. कारण असं वागून तुम्ही मुलाला गैरवर्तन करण्यास प्रोत्साहित करतात. त्यापेक्षा लहान मुलाने असे काही केले तर त्यावर हसण्याऐवजी त्याला समजावून सांगितले पाहिजे.


अनेक वेळा लहान मूल हात वर करूनही घरातील मंडळी खूप हसतात. पण तेच मूल जेव्हा मोठं होऊन हात वर करेल तेव्हा ते तुमच्यासाठी चुकीचं ठरेल. लहानपणापासूनच मुलांना अशा चुकीच्या गोष्टी शिकवू नका ज्या भविष्यात अडचणीचे कारण बनू शकतात. जर तुम्ही मुलासमोर अयोग्य वागलात तर मूल लगेच त्याची कॉपी करते. अशा वेळी त्याच्यासमोर विचारपूर्वक बोलावे. पालकांनी ही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 


मुलांसमोर कधीही खोटे बोलू नका. काहीवेळा तुम्ही नातेवाईक किंवा मित्रांशी खोटे बोलतात जे मूल ऐकत असते. अशावेळी मुलांना वाटते की, खोटे बोलले तरी चालते. त्याचा फार काही परिणाम होत नाही. मुलांना वाटतं की, खोटं बोलणं योग्यच आहे, असा विचार त्याच्या मनात येतो. त्यामुळे मुलं देखील मोठी झाल्यावर किंवा अगदी लहानपणी देखील सहज खोटे बोलतात. 


याशिवाय पालक म्हणून तुम्ही तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा. घरात सतत भांडणे होत असतील तर वातावरण खूप विषारी होते, ज्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. मुलांना चांगल्या सवयी शिकवण्यापूर्वी त्या सवयी तुम्ही स्वतः पाळल्या पाहिजेत. पालक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. 


जया किशोरी सांगतात की, मुलाला चांगल व्यक्तिमत्त्व बनवण्यात 50 टक्के वाटा त्याच्या आई-वडिलांचा आणि 50 टक्के त्याच्या मित्रांचा आणि बाहेरच्या वातावरणाचा असतो. मुलासमोर गैरवर्तन न करण्याचा तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे.कारण या पिढीला लहानपणापासूनच उत्तम संस्कार आणि विचार मिळणे गरजेचे आहे. ज्यामुळे ते स्वावलंबी आणि सक्षम होतील यात शंका नाही.