Winter Healthy Recipes: हिवाळा आला की उब देणारे पदार्थ खाणे गरजेचे असतात. शेंगदाणा-गुळाची चिक्की हे प्रथिने, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून तुमचा बचाव होतोच पण अति खाण्यावरही नियंत्रण होते. शेंगदाणा-गुळाची चिक्की बाजारात सहज उपलब्ध असते, पण जर तुम्ही ती घरीच तयार केली तर तिच्या शुद्धतेमुळे तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. चला शेंगदाणा-गुळाची चिक्की  टपट तयार होणारी रेसिपी जाणून घेऊयात. 


लागणारे साहित्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


250 ग्रॅम शेंगदाणे
200 ग्रॅम गूळ
25 ग्रॅम बटर 
थोडे तूप (ग्रीसिंगसाठी)


हे ही वाचा: Beetroot Chips Recipe: मुलं बीटरूट खात नाहीत? मग त्यापासून बनवा चिप्स, झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या


कशी बनवायची चिक्की?



एका पॅनमध्ये मध्यम आचेवर शेंगदाणे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंतभाजून घ्या. हे लक्षात ठेवा की शेंगदाणे जास्त भाजू नकात, नाहीतर ते जळतील.
या शेंगदाण्याचे कव्हर काढून दोन भाग करून घ्या. 
आता एका वेगळ्या पॅनमध्ये गूळ आणि १/२ कप पाणी घालून मध्यम आचेवर शिजवा. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत शिजवा.


हे ही वाचा: Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी



नंतर वितळलेल्या गुळात शेंगदाणे घालून चांगले मिक्स करावे.  शेंगदाणे गुळाचा एक घट्ट मिश्रण होईपर्यंत शिजवा.
यानंतर ट्रे किंवा प्लेटला तूप लावून ग्रीस करा.


हे ही वाचा: Tomato Chutney Recipe: टोमॅटोची चटणी जेवणाची चव करेल दुप्पट, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या


 


आता तयार मिश्रण ट्रेमध्ये पसरवा आणि बेलनाच्या मदतीने समान प्रमाणात पसरवा.


हे मिश्रण किमान २-३ तास ​​थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चिक्कीला हव्या त्या आकारात कापून घ्या.