77 हजार रुपयांचा टॉवेल! नेटकरी म्हणतायत, `घेण्यासाठी अंगावरचे कपडे...`
Luxury clothing brand balenciaga launch towel skirt : नुकत्याच एका महागड्या ब्रँडनं टॉवेल स्कर्ट लॉन्च केला आहे. त्या टॉवेलच्या किंमतीमुळे आणि फॅशनमुळे हे ब्रँड चांगलंच ट्रोल होतं आहे.
Luxury clothing brand balenciaga launch towel skirt : सध्या कसली फॅशन कधी निघेल हे सांगता येत नाही. कधी काही नवीन वेगळं करण्याच्या प्रयत्नात कधी कधी लोक काहीतरी भलतच करायला लागतात. त्यातही सगळ्यात वेगळं करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला महागडे ब्रॅंड्स दिसतात. यासाठी त्यांची एक वेगळीच कसरत सुरु असते. अनेकदा त्यांचे वेगवेगळे प्रयोग पाहून लोकांना आश्चर्य होते. सध्या सगळ्यांचं लक्ष हे त्या टॉवेल स्कर्टनं वेधलं आहे. सोशल मीडियावर लोक त्या टॉवेलवर जोरदार चर्चा करत आहेत. ज्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
तुम्हाला विश्वास बसत नसेल की असा काही टॉवेल आहे का जो खूप महाग आहे आणि ज्याच्या किंमतीची चर्चा सुरु आहे. तर हा टॉवेल लोकप्रिय कपड्यांचं ब्रँड Balenciaga चा आहे. त्यांनी नुकत्याच येणाऱ्या 2024 च्या स्प्रिंग कलेक्शनला लॉन्च केलं आहे. या कलेक्शनमध्ये त्यांनी टॉवेल स्कर्ट देखील आहे. या टॉवेलची किंमत जर तुम्हाला कळली तर तुम्हाला नक्कीच खूप मोठा धक्का बसेल. तुम्हाला ऐकूण आश्चर्य नक्कीच होईल तर चला जाणून घेऊया या टॉवेल स्कर्टची किंमत काय आहे. या टॉवेल स्कर्टची किंमत ही 925 डॉलर (77 हजार रुपये) असल्याचे म्हटले जात आहे. हे ब्रॅंड अंघोळीचे टॉवेल हे हे 31,572 रुपयात विकतात. हे टॉवेल दोन रंगात येतात एक पांढरा आणि दुसरा ग्रे.
हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यात फर्नीचर कंपनी IKEA नं देखील अप्रत्यक्षपणे भाग घेतला आहे. IKEAUK नं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून Balenciaga टॉवल स्कर्टची खिल्ली उडवत एक टॉवेल स्कर्ट लॉन्च केलं आहे. या टॉवेलची किंमत त्यांनी फक्त 1,654 रुपये केली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत मॉडेलनं Balenciaga च्या वेबसाईटवर जसा मॉडेलनं हा टॉवेल परिधान केला आहे तसाच हुबेहुबे परिधान केला आहे.
हेही वाचा : अक्षय कुमारने 100 कोटी मानधन घेतलेल्या चित्रपटालाही '12th Fail' ने टाकलं मागे; तिसऱ्या आठवड्यातही भरघोस कमाई
सोशल मीडियावर Balenciaga नं हा टॉवेल काय म्हणून लॉन्च केला असेल असं म्हणत त्यांना ट्र्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं विचारलं की 'हे परिधान करण्याची गोष्ट आहे? अनेकांनी विचारलं की कोण आहेत हे लोक जे या टॉवेलसाठी 77 हजार रुपये मोजतील.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला वाटतं की Balenciaga ला श्रीमंत लोकांना ट्रोल करायचं आहे त्यासाठी त्यांनी हा ट्रेंड सुरु केला आहे. किंवा मग गरीब लोकांची खिल्ली उडवण्यासाठी.' तिसरा नेटकरी म्हणला की 'हा टॉवेल घेण्यासाठी अंगावरचे कपडे ही विकावे लागतील.'