Should children Till 7 Years Age Sleep With Parents : भारतात सामान्यपणे मुलं जन्माला आल्यापासून ते मोठं होईपर्यंत पालकांसोबतच झोपतं. पण छोटी कुटुंब पद्धत होत केली त्यानंतर मुलांनी पालकांसोबत कोणत्या वयापर्यंत झोपावे हा प्रश्न निर्माण झाला. परदेशाप्रमाणे मुलांना एकटं झोपण्याची पद्धत चर्चेत आली. अशावेळी पालकांनी मुलांसोबत झोपावे का? की मुलांना एकटं झोपवणं योग्य आहे? हे दोन प्रश्न जोर धरू लागले. या सगळ्यात मुलांना पालकांसोबत झोपवले तर त्यांच्या शरीरावर काही परिणाम होतो का? असा देखील प्रश्न निर्माण होऊ लागले. यावर Global Leading Holistic Halth Guru डॉ. मिकी मेहता यांनी मार्गदर्शन केलंय. 


मुलांना पालकांसोबत झोपायले हवे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांनी त्यांच्या पालकांसोबतच झोपावे. डॉ. मिकी मेहता मुलांना सात वर्षांचे होईपर्यंत पालकांसोबत झोपण्याचा सल्ला दिला जातो. याची अनेक कारणे शोधण्यात आली आहेत. जसे तुम्ही परदेशात बघू शकता, बहुतेक पालक त्यांच्या दोन ते तीन वर्षांच्या मुलांना वेगळ्या खोलीत झोपायला लावतात. पण, ही मुले अनेकदा अंथरुण ओला करतात किंवा रात्री घाबरून उठतात. अनेक वेळा ही मुले अशी स्वप्ने पाहतात ज्यामुळे त्यांच्या मनात भीती किंवा फोबिया निर्माण होतो. एवढेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जर मुल या स्थितीत झोपले तर त्याला चांगली झोप मिळत नाही. एवढंच नाही तर त्याला शारीरिक दृष्ट्या जास्त त्रास होतो. 


पालकांसोबत झोपण्याचे फायदे 


मुलांना पालकांसोबत 7 वर्षांपर्यंत झोपण्याचे सकारात्मक फायदे आहेत. 
मुलं पालकांसोबत झोपल्यास त्याला भावनिक सपोर्ट मिळतो. लहान मुलं अतिशय सेंसिटीव असतात. 
अनेकदा मुलं झोपेत दचकून उठतात तेव्हा त्यांना मायेने जवळ घेतले किंवा थोपटले तर ते गाढ शांत झोपतात. 
अनेकदा मुलं झोपेत अचानक घाबरून उठतात. यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. 


डॉ. मिकी मेहता काय सांगतात?



मुलांना झोपवताना या गोष्टींची घ्या काळजी


मुलांना अचानक वेगळ्या खोलीत झोपवण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे मुलांना वाईट वाटू शकते.


तुमच्या मुलाला वेगळ्या खोलीत झोपण्यापूर्वी मानसिकदृष्ट्या तयार करा.


जेव्हा मूल वेगळ्या खोलीत झोपते, तेव्हा तुमच्या बेडरूमचे दार काही दिवस उघडे ठेवा जेणेकरून मुलाला रात्री भीती वाटली तर तो तुमच्या खोलीत येऊन झोपू शकेल.


जर मूल वेगळ्या खोलीत झोपू लागले असेल, तर मध्यरात्री एक किंवा दोनदा त्याला नीट झोप येत आहे की नाही हे तपासा.


Mirror Neurons म्हणजे काय? 


मिरर न्यूरॉन्स हे मेंदूच्या पेशी आहेत ज्या मुलांना निरीक्षण आणि अनुकरणाद्वारे शिकू देतात आणि सहानुभूती विकसित करतात. मुलं यापद्धतीने पालकांच निरिक्षण करत असतात. अशावेळी मुलं एकटं झोपायचं कसं हे देखील शिकतात. यामुळे त्यांना वयाच्या 7 वर्षांपर्यंत पालकांनी आपल्यासोबत झोपवावे.