Parenting Tips For Father: वडील आणि मुलीचे नाते हे खूप खास असते. मुलीसाठी तिचे वडील हे हिरो असतात. मुलीचे पहिले प्रेम हे तिचे बाबाच असतात. असं म्हणतात की, प्रत्येक मुलगी तिच्या पतीमध्ये बाबांची छबी शोधत असते. पण अनेकदा वडिलांचा स्वभाव कसा आहे त्याचा मुलीची मानसिकता ठरवत असते. तुम्हालाही तुमच्या मुलीला उंच भरारी घ्यायला शिकवायचे असेल तर वडिलांचा स्वभावही खूप महत्त्वाचा ठरतो. मुलीला स्वावलंबी बनवायचे असेल आणि तिच्यात आत्मविश्वासाची कमतरता नसेल तर वडिल म्हणून तुमची भूमिका कशी असायला हवी हे महत्त्वाचे ठरते. तुम्हालाही मुलीच्या नजरेत आदर्श वडील बनायचे असेल तर या गोष्टी कधीच तिच्यासोबत बोलू नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलगी परक्याचे धन असतेः मुलीना सगळ्यात वाईट एका गोष्टीचे वाटत असते की तीला सतत तु परक्याचे धन आहे, असं म्हटलं जातं. एक दिवस तु लग्न करुन सासरी जाणार आहेस, असं मुलीसमोर कधीच म्हणू नका. तुम्ही तुमच्या मुलीसमोर लहानपणापासूनच या गोष्टी बोलत असाल तर आत्ताच ही सवय बदला. कारण यामुळं मुली स्वतःला एकटं समजतात. संपूर्ण परिवारासोबत असूनही तिला एकटं वाटत राहतं. त्याच्याऐवजी मुलीला सतत जाणीव करुन द्या की, तु कुठेही गेलीस तरी हे घर तुझं होतं, आहे आणि नेहमीच राहिलं. तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती इथे येऊ शकते. तुमच्या या शब्दांमुळं तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.


जोरात हसू नकोसः महिलांनी हळू आवाजात बोललं पाहिजे, मोठ्याने हसलं नाही पाहिजे, अशा विचारसरणीचे तुम्ही असाल तर आत्ताच तुमचे विचार बदला. तुमच्या या सवयीमुळं तुम्ही तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. ती कधीच मोकळेपणाने कोणती गोष्ट बोलू शकणार नाही. त्याऐवजी तिला सांगा की तु जशी आहेत तशीच राहा. तिला मोकळेपणाने हसायचंय तर तिला हसू द्या. लोकांच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करण्याची गरज नाहीये. 


चार लोक काय बोलतील: मुलीला कधीच असं करु नकोस, हे करु नकोस, लोक काय म्हणतील असं सांगून अडवू नका. मुलीला बंधनात अडकून ठेवू नका. एक सपोर्टिव्ह वडिल बना आणि लोकांची पर्वा करणे सोडून द्या व तुमच्या मुलीच्या निर्णयाला पाठिंबा द्या. जर तुम्ही मुलीलाच लोकांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यायला लावाल तर ती कधीच तिची मते मांडू शकणार नाही. तिला जे आवडते आणि जे योग्य वाटते तेच करायला शिकवा. त्याचबरोबर तुम्हाला तिला चुकीचा मार्ग ओळखण्याचे कौशल्यही शिकवावे लागेल.


मुलांशी का बोलते: तुमच्या मुलीला कधीच तिचे मित्र-मैत्रिणी निवडण्याबाबत टोमणे मारु नकाय कधीच तिच्या मित्रांवरुन तिला ओरडू नका. पूर्वीच्या काळात मुलांसोबत मैत्री करायला परवानगी नव्हती. मात्र आता काळ बदलला आहे. मुलीकडे तुमचे लक्ष असूद्या पण तिला सतत टोचून बोलणे किंवा मुलांसोबत मैत्री करण्यापासून अडवू नका. यामुळं तिचा आत्मविश्वास कमजोर होऊ शकतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)