Personality Test : तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किती जाण आहे, हे अनेकदा त्या व्यक्तीच्या स्वभावातून उलगडत जातं. पण, हीच व्यक्ती स्वभाव जाणीवपूर्वक लपवत असेल तर? गमतीची बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे फक्त त्याच्या स्वभावातूनच नव्हे, तर त्याच्या शारीरिक रचनेतून, त्याच्या कृतीतूनही लक्षात येतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवी शरीर आणि मानवी स्वभाग यांचं एक अनोखं समीकरण असून, अनेक तज्ज्ञ मंडळींनी यासंदर्भात विविध पैलूंच्या माध्यमातून निरीक्षण केलं असून, हे निरीक्षण इतकं कमाल आहे की, यातील सिद्धांतांच्या मदतीनं व्यक्तीच्या चेहऱ्याचा आकारही त्याच्या स्वभावाची झलक दाखवू शकतो. विश्वास बसत नाहीय? महिलांच्या चेहऱ्याच्या आकाराची उदाहरणं पाहाच... 


अंडाकृती चेहरा 


एखाद्या महिलेचा चेहरा अंडाकृती असल्यास या महिला अतिशय वस्तुनिष्ठ आणि कृतीनिष्ठ असतात, कामाच्या प्रती या महिला प्रचंड एकनिष्ठ असतात. या महिला कुटुंबनिष्ठ असण्यापेक्षा करिअरला प्राधान्य देणाऱ्या असतात. आव्हानांवर सहज मात करण्याचा गुण त्यांच्याकडे असतो. 


वर्तुळाकार चेहरा 


वर्तुळाकार चेहऱ्याच्या महिला अतिशय संवेदनशील, भावनिक आणि काळजी घेणाऱ्या असतात. या महिला आयुष्याचा प्रत्येक क्षण मनसोक्त जगतात, इतरांनाही आनंद देतात. इतरांची मदत करणं, त्यांचा विचार करणं, इतरांवर विश्वास ठेवणं आणि विश्वास जिंकणं हे या महिलांचे गुण. या महिला नात्यांमधील स्थैर्याला प्राधान्य देतात. 


हेसुद्धा वाचा : एक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम


चौकोनी चेहरा 


साधारण चौकोनी चेहरा असणाऱ्या महिला कमालीच्या उत्साही आणि सकारात्मक असतात. इतरांना स्थैर्य देण्यासाठी धडपडणाऱ्या या महिला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सहज यशस्वी ठरतात. कोणत्याही तणावाच्या परिस्थितीवर यांच्याकडे तोडगा असतो. या महिला कमालीच्या निरीक्षण करणाऱ्यांपैकी एक असतात. 


हृदयाच्या आकाराचा चेहरा 


कल्पनाशक्तीच्या कक्षा रुंदावणाऱ्या आणि सतत कल्पनाविश्वात रमणाऱ्या महिलांच्या चेहऱ्याचा आकार साधारण हृदयासारखा असतो. कलाक्षेत्राकडे ओढ असणाऱ्या या महिला कमालीच्या जिद्दी आणि धीराच्या असतात. वेळप्रसंगी संतप्त आणि परिस्थितीपुढं हार न मानण्याचा त्यांचा गुण अनेकांनाच थक्क करणारा असतो. 


(वरील माहिती निरीक्षणांच्या संदर्भातून देण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)