एक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम

Indian Railway :  भारतीय रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा सर्वांनाच असली तरीही हा प्रवास करताना रेल्वेच्या काही नियमांचं पालन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

सायली पाटील | Updated: Jul 4, 2024, 11:14 AM IST
एक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम title=
indian Railway fines chain pullers know the rules and latets updates Mumbai local

Indian Railway Rules :  भारतीय रेल्वेनं प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत आजवर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पण, याच रेल्वेनं प्रवाशांना वेळोवेळी काही नियमांची आठवणही करून दिली. प्रवाशांच्या हितासाठी आणि रेल्वेच्या सुव्यवस्थेसाठी आखण्यात आलेल्या या नियमांचं पालन केलं जाणं बंधनकारक असल्याचं वेळोवेळी रेल्वेकडून सांगण्यात आलं. असं असूनही काही प्रवाशांकडून मात्र सातत्यानं या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळं रेल्वेनंही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. 

प्रवाशांना केलल्या शिक्षेतून रेल्वेनं आतापर्यंत दंड स्वरुपात मोठी रक्कम वसूल केली असून, इथून पुढं या शिक्षेतून तरी प्रवाशांना अद्दल घडेल अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. 

रेल्वेनं कोणाला केली शिक्षा? 

रेल्वे डब्यात असणाऱ्या अलार्म चेनचा दुरूपयोग करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत एप्रिल- 2023 पासून जून - 2024 दरम्यानच्या कालावधीत (Central Railway) मध्य रेल्वेकडून सदर प्रकरणी 11434 तक्रारींची नोंद  केली आहे. या तक्रारंच्या धर्तीवर तब्बल 63.21 लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. 9657 प्रवाशांवरील कारवाईतून ही दंडवसूली करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. 

रेल्वेत असणारी चेन नेमकी कशासाठी? 

  • कोणतंही गुन्हेगारी कृत्य अथवा गैरप्रकार घडल्यास... 
  • आग लागल्याची घटना घडल्यास... 
  • ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना एखादा अपघात झाल्यास...
  • एखादी वैद्यकिय आपात्कालिन समस्या उदभवल्यास रेल्वेमध्ये असणारी चेन ओढता येते. 

रेल्वे सेवांचा योग्य वापर करत रेल्वेच्या कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता राखण्यासाठी वरील नियमांचं पालन केलं जाणं अपेक्षित आहे. पण, मागील वर्षभरात काही प्रवाशांनी मात्र या सुविधेचा गैरवापर केल्याचं आढळून आलं. 

हेसुद्धा वाचा : 'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच 

रेल्वेमधून मध्येच उतरणं, मधल्या स्थानकांवर चढणं या आणि क्षुल्लक कारणांसाठी प्रवाशांनी या साखळीचा गैरवापर केल्याची बाब निदर्शास आली. प्रत्यक्षात हे कृत्य रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. ज्या कारणास्तव वर्षभराचा कारावास, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशा स्वरुपातील शिक्षा होऊ शकतात, किंबहुना रेल्वेनं या शिक्षा करत लाखोंची दंडवसुली केली आहे. 

दंडवसुलीची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे...

विभाग प्रकरणं/ अटक दंडवसुली (लाखांमध्ये)
मुंबई विभाग 43873741 23.47
भुसावळ 29312824 21.76
नागपूर 17061404 8.71
पुणे 19921440 7.73
सोलापूर 418248 1.54