घरातील प्रेशर कुकर बनेल टाइम बॉम्ब, गॅसवर ठेवण्यापूर्वी चेक करा या 5 गोष्टी
प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. अन्यथा प्रेशर कुकर ब्लास्ट होऊ शकतो. दरवर्षी अशा अनेक दुर्घटना समोर येतात.
सध्या प्रेशर कुकरचा वापर जवळपास प्रत्येक घरांमध्ये केला जातो. याच मुख्य कारण म्हणजे यात जेवण लवकर शिजतं तसेच कुकरमध्ये जेवण बनवताना तेथे उभं राहण्याची गरज नसते. परंतु प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. अन्यथा प्रेशर कुकर ब्लास्ट होऊ शकतो. दरवर्षी अशा अनेक दुर्घटना समोर येतात, तेव्हा प्रेशर कुकरचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.
कुकर जास्त भरणे :
कुकरची कॅपिसिटी लिटरमध्ये मापली जाते. जर कुकरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त अन्न भरलं गेलं तर कुकर ब्लास्ट होण्याचा धोका असतो. असं यामुळे होतं कारण कुकरमध्ये जास्त सामना भरल्याने त्याचे वेंट बंद होतात, ज्यामुळे त्यातून वाफ बाहेर पडू शकत नाही. म्हणून नेहमी कुकर तीन चतुर्थांशच भरायला हवा.
हेही वाचा : जीन्स पँटला छोटा खिसा का असतो? 99 टक्के लोकांना माहित नाही खरं करण.. हे आहे उत्तर
पाणी कमी टाकणे :
प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना त्यात पाणी योग्य प्रमाणात टाकणे गरजेचे असते. कारण जास्त पाणी झाल्यावर कुकरमधून पाणी बाहेर फेकले जाते. तर पाणी कमी पडल्यावर कुकरमधील अन्न करपून जाण्याची भीती असते, असे झाल्यास कुकर ब्लास्ट सुद्धा होऊ शकतो.
कुकर नीट स्वच्छ करणे :
कुकर स्वच्छ करणं हे अवघड काम असतं. ज्यामुळे काही लोकांकडून कुकर नीट स्वच्छ होत नाही आणि त्यात घाण तशीच राहते. जर कुकरची वाफ जिथून बाहेर येते तिथे जर कचरा, घाण तशीच राहिली तर वाफ बाहेर न आल्याने कुकर ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुकरची स्वच्छता नीट करणे गरजेचे आहे.
गॅस बाहेर न काढता कुकर उघडणे :
अनेकदा घाई गडबडीमध्ये कुकर गॅसवरून खाली उतरवताच काहीजण खोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे अतिशय धोकादायक ठरू शकते यामुळे कुकरचा ब्लास्ट होऊ शकतो. नेहमी गॅस बंद केल्यावर 5 ते 10 मिनिटांनी कुकरमधील सर्व गॅस निघाल्याची खात्री केल्यावरच कुकर उघडावा.
'या' गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकतो ब्लास्ट :
प्रेशर कुकर ब्लास्ट होण्याचं कारण रबर, शिटी तुटणे, सेफ्टी वाॅल्वमध्ये गडबड, रेग्युलेटर वाॅल्वचं वजन कमी होणं सुद्धा असू शकतं. याशिवाय खराब दर्जाच्या किंवा जुन्या कुकरमध्येही स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.