small pockets in jeans pants : सर्वच वयोगटातल्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये जीन्स पँट (Jeans Pants) वापरण्याचा ट्रेंड आहे. युवा पिढीत तर जीन्स पँटची क्रेझ पाहायला मिळते. कॉलेजमध्ये जाणारे 99 टक्के तरुण आणि तरुणी जीन्स पँट घालतात. इतकंच नाही तर सध्या कॉर्पोरेट ऑफिसमध्येही जीन्स पँट घालण्याचा ट्रेंड आहे. प्रवासातह विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवासातही जीन्सला प्राधान्य दिलं जातं. यांच कारण म्हणजे जीन्स पँट लवकर मळत नाही, कितीही दिवस वापरता येते शिवाय तिचा लूकही कुल वाटतो.
जीन्स पँटमध्ये लहान खिसा का असतो?
जीन्स पँट वापरणाऱ्या प्रत्येकाने पँटला मागे किंवा पुढे एक लहानसा खिसा (Small Pockets in Jeans Pants) पाहिला असेल. पण त्या खिशाचा वापर कशासाठी असतो हे 99 टक्के लोकांना माहित नसेल. कदाचित अनेक लोकांनी याकडे लक्ष दिलं नसले.किंवा जीन्स पँटची ही स्टाईल आहे म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण जीन्स पँटलला असलेला लहान खिसा ही केवळ स्टाईल नाहीए. तर हा खिसा बनवण्यामागे मोठं कारण आहे.
दीडशे वर्षांपूर्वीची परंपरा
वास्तिवक जीन्स पँटला असणाऱ्या या छोट्या खिशाला वॉच पॉकेट किंवा फोब पॉकेट असं म्हटलं जातं. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे घड्याळ किंवा इतर लहान वस्तू पँटमध्ये सुरक्षित ठेवणं हा होता. जीन्स पँटमध्ये लहान खिसा असल्याचा इतिहास जवळपास दीडशे वर्ष जूना आहे. 19 व्या शतकात जीन्स पँटला लहान खिसा बनवण्याला सुरुवात झाली. त्यावेळी मनगटावर घड्याळ बांधण्याची परंपरा नव्हती. त्यावेळी पॉकेट वॉच म्हणजे साखळी असलेलं गोलकार लहान घड्याळ असायचं. हे घड्याळ सुरक्षित ठेवण्यासाठी जीन्स पँटला लहान खिसा बनवण्यात आला.
याशिवाय त्यावेळी मजूरांना काम करताना गरजेच्या गोष्टी सोबत ठेवाव्या लागत होत्या. त्या पडू नये म्हणून मजबूत खिशाची गरज छोट्या खिशाने भरून काढली. हे खिसे खराब होऊ नयेत म्हणून खिशांच्या दोन टोकांना बटनं लावण्यात आली.
छोट्या खिशाचे फायदे
बदलत्या काळात पॉकेट वॉच बंद झाली. लोकांच्या मगटावर घड्याळं आली. पण जीन्स पँटला छोट्या पाकिटाची स्टाईल मात्र आजही कायम आहे. छोट्या पाकिटात आता सुट्टे पैसे, चावी, पेन ड्राईव्ह यासारख्या वस्तू सुरक्षितरित्या ठेवल्या जातात.